‘थिएटर फ्लॅमिंगो’  Dainik Gomantak
मनोरंजन

आपल्यामधील 'अभिनेत्यां' चा शोध घेतांना...

गोव्यात (Goa) ‘थिएटर फ्लॅमिंगो’ (Theater Flamingo) या संस्थेच्या माध्यमातून केतन जाधव सातत्याने रंगभूमीविषयक उपक्रम राबवत असतो.

दैनिक गोमन्तक

जेव्हा मी ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ (नाट्यशाळा) मधून उत्तीर्ण झालो तेव्हा माझ्यासोबतचे माझे मित्र कलाकार सिनेमा-कामाच्या शोधात थेट मुंबईला गेले. पण मला स्वतःला माझे अभिव्यक्तीचे माध्यम, ‘थिएटर’ बदलायचे नव्हते. थिएटरमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमात आमची ओळख मेयरहोल्ड, स्टॅनिस्लावास्की, मायकेल चेकोव्ह, ब्रेख्त, ग्रोटोस्की इत्यादी सर्व पाश्चिमात्य नाट्यकर्मींशी झाली होतीच. मला फक्त एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक थिएटर अभ्यासक आणि एक जागृत आणि सजीव माणूस म्हणून विकसित होण्यासाठी प्रत्येक तंत्राचा बारकाईने आणि सातत्यपूर्ण अभ्यास करायचा होता.

अबानी बिस्वास आयुष्यभर ग्रोटोस्कीच्या तंत्राचा सराव करत होते आणि 80 च्या दशकात स्वत: त्यानी ग्रोटोस्कीसोबत दशकभर काम केले होते. मला जेव्हा त्यांच्याबद्दल कळले, तेव्हा ते संचलित करत असलेल्या रेसिडेन्सीमध्ये भाग घेण्यात मी उशीर केला नाही. आबानी यांनी अभिनेते/कलाकारांसाठी बोलपूर, पश्चिम बंगाल येथे, गुरु रवींद्रनाथ टागोरांची, स्वप्नसद्रुश्य भूमी असलेल्या शांतीनिकेतनजवळच एक जागा उभारली आहे.

भारतीय वंशाच्या सर्वात मूळ आणि सेंद्रिय कलाप्रकारांच्या एकत्रीकरणासह ह्या कार्यशाळेत काम केले जाणार होते. त्यात 'छाऊ' (जो पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील प्राचीन आदिवासी नृत्य प्रकार आहे), 'गोटीपुआ' (जे ओरिसातील ‘ओडिसी’ शास्त्रीय नृत्याचे मुळ आहे), 'कलारीपयट्टू' (जी केरळमधील सर्वात जुनी मार्शल आर्ट्स आहे) आणि ‘बाउल गान’ (जे कविता, संगीत, गाणे आणि नृत्य यांचे मिश्रण आहे व जे मानवजातीचे देवाशी नाते शोधण्याचा आणि आध्यात्मिक मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न करते.) यांचा समावेश होता.

त्यानां (अबानीना) जेर्झी ग्रोटोव्स्कीचे काम नीट माहीत होते. त्यानी आम्हांला ग्रोटोस्कीचा दृष्टीकोन समजावला आणि ग्रोटोस्कीप्रणित शारीरिक व्यायामाचे प्रशिक्षण दिले, जे खरोखरच शरीरासाठी आवश्यक होते. भारतीय विधी, आफ्रिकन विधी (हैती आदी) यांच्या अनेक पैलूंची ओळख घडली ज्यातून अभिनयाच्या सादरीकरणात्मक ग़ुणांचा आम्ही वेध घेऊ शकलो. अभिनेत्यांनी नीट सरळ उभे राहून आपली वाक्ये बोलायची असतात ही धारणा विसरणे महत्वाचे असते. अधिकांशपणे, आपली स्वतःची उर्जा समजून घेणे, निसर्ग आणि स्वतःमधील संबंध शोधणे, इत्यादीसंबंधी व्यायाम (Exercise) कार्यशाळेत अंतर्भूत होते, जे आपल्या स्वतःचा एक अधिक प्राचीन/आदिम भाग बाहेर आणण्यासाठी, पर्यावरणाला समजून घेऊन, आतील आवाजाच्या समजाला आकार देऊन, आम्हाला जागृत करण्यासंबंधी मदत करत होते.

अबानीचे पुत्र अनिल अॅलेसॅंड्रोच्या नेतृत्वाखाली ‘एट्युडेस’ सारख्या कसरतींचा वापर करून शेक्सपियरचे ‘मॅकबेथ’ हे नाटक (Drama) बसवले गेले. मी निश्चितपणे म्हणू शकतो की, मला त्यातून हे शिकता आले, केवळ शब्दांमधून व्यक्त होण्यापेक्षा, सादरीकरणावर अधिक जोर असणे आवश्यक असते, आणि त्याचवेळी रंगमंचावर अभिनेता म्हणून सिद्ध होण्यासाठी अभिनेत्याने आपली उपस्थिती आणि उर्जा शोधणे क्रमप्राप्त असते. थिएटर आणि चित्रपटाच्या तुलनेत, थिएटरला चित्रपट (Movie) आणि टेलिव्हिजनचा दिखावा आणि परिणाम रंगमंचावर मांडता आला पाहीजे ही कल्पना ग्रोटोस्कीने नेहमी नाकारली आणि घोषित केले की थिएटरचा प्राथमिक घटक अभिनेता आणि प्रेक्षक यांच्यातील संबंध हाच आहे. मी याचा अनुभव अनिल अॅलेसॅंड्रोच्या ‘एट्युड’ वर्गात, भारताच्या (India) कानाकोपऱ्यातून आलेल्या आणि भारताबाहेरच्या, 24 वेगवेगळ्या सहभागींसोबत ‘मॅकबेथ’चा शोध घेताना घेतला. केतन जाधव ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ (नाटक शाळा)चा स्नातक आहे. गोव्यात ‘थिएटर फ्लॅमिंगो’ या संस्थेच्या माध्यमातून तो सातत्याने रंगभूमीविषयक उपक्रम राबवत असतो. त्याने हल्लीच कलकत्त्यात पार पडलेल्या रंगभूमीसंबधातल्या ‘ग्रोव्टोस्की’ शैलीची ओळख करून देणार्या एका कार्यशाळेत भाग घेतला.

-केतन जाधव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

SCROLL FOR NEXT