katrina kaif
katrina kaif 
मनोरंजन

साउथ स्टार सोबत रूपेरी पडद्यावर झळकणार कॅटरीना

गोमन्तक वृत्तसेवा

मुबई: अभिनेत्री कॅटरिना कैफ(katrina kaif) बॉलिवूडमधली फेमस अभिनेत्री आहे. बूम चित्रपटापासून करिअरची सुरूवात करणार्‍या कॅटरिनाने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीतील अनेक उत्तम चित्रपटांत काम केले आहे. निर्मात्यांना कॅटरिना कैफला त्यांच्या चित्रपटात घेण्यास देखील आवडते. हेच कारण आहे की अभिनेत्रीने प्रत्येक मोठ्या स्टारबरोबर काम केले आहे. आता ही अभिनेत्री दक्षिणेतील एका सुपरस्टारबरोबर काम करताना दिसणार आहे. टायगर 3 साठी सध्या कॅटरिना कैफ चर्चेत असूनही कोविडमुळे त्याचे शूटिंग बंद झाले आहे. पण यादरम्यान, निर्माता श्रीराम राघवनने(Sriram Raghavan) कॅटरिनाला पुढच्या चित्रपटासाठी घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.

विजय सेतूपतीसोबत दिसणार कॅटरिना
मिळालेल्या वृत्तानुसार कॅटरिना कैफ पहिल्यांदाच दक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपतीसोबत(Vijay Sethupathi) दिसणार आहे. इतकेच नाही तर अभिनेत्री पहिल्यांदाच श्रीराम राघवनसोबतही काम करणार आहे. कॅटरिनाने या चित्रपटाचे कामही सुरू केले असल्याची माहिती मिळाली आहे. चित्रपटाचे शीर्षक सध्या निश्चित केले नाही पण असे माहितीनुसार मेरी ख्रिसमसच्या नावावर चित्रपट तयार केला जाऊ शकतो.

 90 मिनिटांचा असणार चित्रपट

या संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग वेळापत्रक 30 दिवसांचे असेल. इतकेच नाही तर हा चित्रपट केवळ 90 मिनिटांचा असणार आहे. विजय सेतूपती आणि कॅटरिना कैफ एकत्र काम करणार असल्याची बातमी उघडकीस आल्यापासून दोघांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सलमान खानबरोबर टायगर 3 चे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर कॅटरिना या चित्रपटाचे शूट सुरू करण्याची शक्यता आहे. यासोबतच कॅटरिनाचा सुर्यवंशी हा चित्रपटदेखील प्रदर्शित हेणार आहे. अक्षय कुमार आणि कॅटरिना या चित्रपटात सोबत दिसणार आहे. याशिवाय कॅटरिना 'फोन भूत' या हॉरर कॉमेडीमध्ये दिसणार आहे. 2019 मध्ये भारत या चित्रपटात कॅटरिना ने काम केले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT