katrina Kaif Vicky Kaushal Instagram
मनोरंजन

कतरिना अन् विकीच्या चाहत्यांसाठी खुश खबर

Katrina Kaif Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधील क्युट कपल आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची जोडी पॉवर कपल्सपैकी एक आहेत. लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांना चाहत्यांचे खुप प्रेम मिळत आहे. ही ऑफस्क्रीन हिट जोडी लवकरच ऑनस्क्रीन एकत्र दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बॉलिवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी लवकरच एका जाहिरातीत एकत्र काम करतांना दिसणार आहेत. (Katrina Kaif Vicky Kaushal News)

मिळालेल्या माहितीनुसार दोघेही 'डेकोर एॅड'मध्ये एकत्र काम करू शकतात. या जाहिरातीसाठी दोघेही शाहरुख खान आणि गौरी खानला रिप्‍लेस करत नाहीत. एक नवीन सेगमेंट असेल, ज्याला कतरिना आणि विकी यांनी मान्यता दिली आहे.

कतरिना आणि विकीला ब्रँडने सहकार्यासाठी संपर्क साधला होता आणि दोघांनीही त्यांना संमती दिली असावी. कतरिना आणि विकी हे बॉलिवूडचे लोकप्रिय जोडप आहे आणि चाहते त्या दोघांना एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत.

कतरिना आणि विकीला अनेक चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याच्या ऑफर मिळाल्या असल्या तरी त्यांना एकही आवडल्या नाही आणि काहीतरी चांगलं करण्याची त्यांची योजना आहे. मात्र एडच्या ऑफरबाबत त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जर असे खरोखर घडले तर दोघांच्या चाहत्यांसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी असेल.

कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधील काही निवडक लोकांना आमंत्रित केले होते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आणि चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT