Bollywood actress Katrina Kaif Dainik Gomantak
मनोरंजन

कतरिना कैफने लग्नाआधी उचलले 'हे' मोठे पाऊल

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या कपलच्या लग्नाबाबत दररोज वेगवेगळ्या बातम्या येत असतात. मात्र, विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

विकी आणि कतरिना राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या लग्नाला निवडक लोकच हजेरी लावणार आहेत. एवढेच नाही तर या कपलने लग्नात अनेक बंधनेही लादली आहेत. आता याच दरम्यान कतरिना कैफबद्दल एक नवीन बातमी समोर येत आहे, जी ऐकून विकीचे चाहते खूश होतील.

कतरिना कैफ पंजाबी मुंडे विकी कौशलसोबत लग्न करणार आहे हे सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर कतरिना कैफ लग्नाआधी पंजाबी शिकत आहे. कतरिनाच्या या हालचालीमुळे तिला कौशल कुटुंबाशी संवाद साधणे तर सोपे होणार आहेच पण एक अभिनेत्री म्हणून तिला या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे. ही बातमी आल्यानंतर त्याचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत. बातम्यांनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत.

शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या विवाहासंदर्भात बैठक घेतली. याबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, विवाह सोहळ्याशी संबंधित कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकाऱ्यांसोबतच लग्नाच्या आयोजनाशी संबंधित लोकही सहभागी झाले होते. कतरिना आणि विकीच्या लग्नाला 120 लोक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर प्रायव्हसी लक्षात घेऊन लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना मोबाईल आणण्यास मनाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT