Katrina Kaif B'Day Instagram
मनोरंजन

Katrina Kaif B'Day: कतरिना कैफ लग्नानंतर विकीसह साजरा करणार पहिला वाढदिवस

Katrina Kaif Birthday News: कतरिना कैफ लग्नानंतर तिचा वाढदिवस कसा साजरा करणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची सुंदर आणि प्रसिध्द अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आज 16 जुलै 2022 रोजी तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. विकी कौशलसोबत लग्नानंतरचा हा पहिला वाढदिवस आहे. विकीने कतरिनाच्या वाढदिवसासाठी काय तयारी केली आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खुप उत्सुक आहेत. तो आपल्या बायकोला काय सरप्राईज देणार आहे? चला तर मग जाणुन कतरिना तिचा 39 वा वाढदिवस तिच्या पतीसोबत कसा साजरा करणार आहे. (Katrina Kaif Birthday News News)

कतरिना कैफचा 39 वा वाढदिवस मालदीवमध्ये साजरा करणार

कतरिना कैफ एक दिवस अगोदर म्हणजेच 15 जुलैला विकी कौशलसोबत मालदीवला रवाना झाली होती. आज ती तिथेच तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. हे ऐकून तुम्ही विचार करत असाल की कतरिनाचा (Katrina Kaif) हा वाढदिवस खूप संस्मरणीय आणि सुंदर असणार आहे. विकी कौशल लग्नानंतर पत्नीच्या पहिल्या वाढदिवसात कोणतीही कसर सोडणार नाही, तेव्हाच तो देश सोडून कतरिनासोबत मालदीवमध्ये गेला आहे.

* या सेलिब्रेशनमध्ये हे स्टार्सही सहभागी होतील:

वाढदिवसाच्या पार्टीत फक्त कतरिना कैफ आणि विकी कौशलच असतील की इतर कोणी पाहुणेही हजेरी लावतील? हा प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच आला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की या सेलिब्रेशनमध्ये काही बॉलीवूड (Bollywood) स्टार्सही दिसणार आहेत. जे या दोघांचे खूप खास आणि लाडके आहेत. विकी कौशलचा भाऊ अभिनेता सनी कौशल आणि अभिनेत्री शर्वरी वाघ हे देखील या पार्टीत सहभागी होणार आहेत. सनी आणि शर्वरी एकमेकांना डेट करत असल्याचं समजले आहे. याशिवाय चित्रपट निर्माते कबीर खान आणि मिनी माथूर देखील कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मालदीवला (Maldives) पोहोचले आहेत. एक दिवसापूर्वी कतरिना कैफ विकी कौशलसोबत मुंबई (Mumbai) विमानतळावर दिसली होती.

कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट 'फोन भूत' च्या रिलीजची तयारी करत आहे. याशिवाय ती सलमान खानसोबत 'टायगर 3'मध्येही दिसणार आहे. प्रियांका चोप्रा जोनास आणि आलिया भट्टसोबतचा त्याचा 'रोड ट्रिप' चित्रपट थांबला आहे. त्याचबरोबर विकी कौशल सध्या काही वेगळ्या चित्रपटांमध्ये (Movie) काम करत आहे. तो मेघना गुलजारच्या बायोपिक 'साम बहादूर'ची तयारी करत आहे. त्याचे पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये 'मेरा नाम गोविंदा' आहे. विकी एका कॉमेडी ड्रामा चित्रपटात सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT