कार्तिक आर्यनचा डेब्यू प्रोडक्शन शेहजादा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मंद सुरूवात केली आहे. शेहजादा हा चित्रपट सुपरहिट तेलगू चित्रपट आला वैकुंठापुरमुलूचा रिमेक आहे. तीन आठवड्यांहून अधिक काळ थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या पठाण आणि मार्वलचा अँट-मॅन अॅंड द वास्प: क्वांटुमॅनिया या चित्रपटांचा सामना शहजादाला करावा लागला.
कार्तिक आर्यनच्या शहजादाचे इंडस्ट्री ट्रॅकर Sacnilk नुसार, पहिल्या दिवसाचे संकलन 7 कोटी रुपये (प्रारंभिक अंदाज) नोंदवले गेले आहे. ही संख्या कार्तिकच्या शेवटच्या रिलीज, भूल भुलैया 2 ने पहिल्या दिवशी केलेल्या कमाईच्या निम्मी आहे. भुलभुलैय्याने पहिल्या दिवशी 14 कोटी रुपये कमावले होते.
गुरुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत, चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी PVR, INOX आणि Cinepolis या तीन नॅशनल चेनमध्ये फक्त 12,000 तिकिटे विकली होती. इतकेच नाही तर कोणत्याही आघाडीच्या बॉलीवूड अभिनेत्यासाठी पोस्टमधील सर्वात कमी अॅडव्हान्स बुकिंग हे मानलं जात आहे.
बॉक्स ऑफिस इंडियानुसार, बाय-वन-गेट-वन-फ्री तिकिटाच्या प्रोत्साहनामुळे चित्रपट हा आकडा गाठण्यात यशस्वी झाला आहे. तिकीट काउंटरवरील शहजादाचा मोठा स्पर्धक पठाण आणि अँट-मॅन आणि द वास्प: क्वांटुमेनियाने अनुक्रमे 2.50 कोटी आणि 9 कोटी रुपये कमावले.
सुरूवातीला या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती, ही एक स्मार्ट चाल मानली जात होती. कारण याच काळात पठाणची जोरदार घोडदौड सुरू झाली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.