Kartik Aryan Dainik Gomantak
मनोरंजन

Kartik Aryan : कॅन्सरने आमचं कुटूंब उद्ध्वस्त झालं असतं पण माझ्या आईने...कार्तिक आर्यनने केली भावनिक पोस्ट..

अभिनेता कार्तिक आर्यनच्या आईने कॅन्सरवर मात केल्यानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

Rahul sadolikar

बॉलिवूडचे असे कित्येक स्टार आहेत ज्यांनी कॅन्सरवर मात केली आहे. आपली इच्छाशक्ती आणि योग्य उपचारांनी या आजारावर मात करता येते हेच या स्टार्सनी दाखवलं आहे. सध्या कार्तिक आर्यनच्या एका पोस्टची सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे .

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनची आई माला आता कॅन्सरपासून मुक्त झाल्या आहे. कार्तिक आर्यनने आपल्या आईसाठी एक हृदयस्पर्शी नोट शेअर केली आहे, जिने या भयंकर आजारावर मात केली आहे आणि आयुष्याच्या सुंदर प्रवासात पुढे जात आहे.

कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमध्ये त्याच्या आईच्या धैर्याची प्रशंसा केली आहे आणि त्या कठीण क्षणांबद्दल देखील सांगितले आहे ज्याने त्याच्या कुटुंबाला प्रेम आणि एकमेकांना आधार देण्याबद्दल शिकवले आहे. 

कार्तिक आर्यनने लिहिले आहे की, 'काही काळापूर्वी या महिन्यात कॅन्सरसारखा आजार गुप्तपणे आमच्या घरात आला आणि आमच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.'

त्यांनी या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'आम्ही हताश आणि निराश तसेच असहाय होतो. पण माझ्या आईची इच्छाशक्ती आणि कधीही हार न मानण्याची सवय यामुळे आम्ही मोठ्या हिमतीने पुढे गेलो आणि अंधारात विजय मिळवला आणि ही लढाई आम्हाला जिंकायची होती.

 शेवटी याने आम्हाला काय शिकवले आहे आणि आम्ही दररोज जे शिकत आहोत ते म्हणजे तुमच्या कुटुंबात प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा चांगले काहीही नाही.'#SuperHero #CancerWarrior

याआधीही कार्तिक आर्यनने त्याच्या आईसोबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्या व्हिडिओमध्ये कार्तिक आपल्या आईच्या कॅन्सरबद्दल बोलताना दिसत होता. कार्तिकची आई ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती. व्हिडिओमध्ये आपल्या आईबद्दल बोलताना कार्तिक खूप भावूक झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

SCROLL FOR NEXT