Kareena Kapoor in Singham 3 Dainik Gomantak
मनोरंजन

Kareena Kapoor: बेबो दिसणार रोहित शेट्टीच्या 'या' चित्रपटात; सोशल मिडियावर पोस्ट करत केला खुलासा

Kareena Kapoor: रणवीरने यापूर्वी रोहित शेट्टीसोबत 'सिम्बा' (2018), 'सूर्यवंशी' (2021) आणि 'सर्कस' (2022) या तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

Kareena Kapoor: बॉलीवूडची बेबो करिना कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिने जाने जान या चित्रपटातून पदार्पण केले आहे. महत्वाचे म्हणजे बॉलीवूडमध्ये करिना मोठ्या काळानंतर परतली असून ओटीटीवर तिचा हा पहिलाच चित्रपट होता.

आता करिना कपूर पून्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. तिने सोशल मिडियावर पोस्ट केल्याने बेबो आता रोहित शेट्टीच्या 'सिंघम ३' मध्ये दिसणार आहे. सध्या ती शूटिंगसाठी हैद्राबादमध्ये आहे. इंस्टाग्रामवर तिने सेटवरील फोटो शेअर करत रोहित शेट्टीला टॅग केले आहे.

महत्वाचे म्हणजे, तिने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, रोहित शेट्टी माझ्या अनेक आवडत्या दिग्दर्शकापैकी एक आहे आणि हा माझा त्याच्याबरोबरचा चौथा चित्रपट आहे. करीना कपूरच्या या पोस्टवर रणवीर सिंग कमेंट सेक्शनमध्ये म्हणाला, 'तिच्यासोबतचा हा माझासुद्धा चौथा चित्रपट आहे आणि तुझ्यासोबतचा पहिला चित्रपट आहे.

रणवीरने यापूर्वी रोहित शेट्टीसोबत 'सिम्बा' (2018), 'सूर्यवंशी' (2021) आणि 'सर्कस' (2022) या तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. एकूणच, करिनाने आता रोहित शेट्टीसोबत 'सिंघम 3' या त्याच्या पुढच्या चित्रपटात काम करण्याचे निश्चित केले आहे.

मात्र, त्यांच्या भूमिकेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आता सिंघम ३ मध्ये करिना कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT