Kareena Kapoor Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Kareena Kapoor Pregnancy: करीना कपूरने आपल्या प्रेग्नेंसीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाली- 'इट्स द पास्ता अँड वाईन गाईज

Kareena Kapoor Khan News: सध्या करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहेत.

दैनिक गोमन्तक

'बेबो' म्हणून बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूरला ओळखले जाते. सध्या करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहेत. करिना कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी करीना कपूर लंडनमध्ये कुटुंबासोबत व्हेकेशन एन्जॉय करत होती. त्यादरम्यान, तिने आपले काही आनंदाचे क्षण तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यानंतर करिना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, आता या चर्चांना करीनाने पूर्णविराम दिला आहे. करीनाने तिच्या प्रेग्नेंसीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

काय केला खुलासा?

करीनाने इंस्टाग्रामवरुन आपल्या प्रेग्नेंसीचा खुलासा केला आहे. तिने स्टोरीमध्ये प्रेग्नेंसीबाबत सांगितले, "माझे पोट हे पास्ता आणि वाईनचे सेवन केल्याने सुटले आहे. मी प्रेग्नेंट नाही. कारण सैफ अली खानने याआधीच म्हटले आहे की, मी देशाच्या लोकसंख्येकरता खूप योगदान दिले आहे." त्यामुळे आता बॉलिवूडची 'बेगम' करीना कपूर खान प्रेग्नेंट नसल्याचे उघड झाले आहे.

Kareena Kapoor Khan

अशी झाली चर्चा सुरु

सैफ (Saif Ali Khan) आणि करीनाच्या (Kareena Kapoor) लंडन व्हॅकेशनदरम्यान एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरुन बेबो प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली होती. कारण तो फोटो पाहुन तसेच वाटत होते. तो फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बम्प स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्या फोटोवरुन (Photo) करीना पुन्हा तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण, आता करीनाने स्वत: खुलासा करत चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

व्हायरल झालेला फोटो

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये करीना ब्लॅक कलरच्या टॉपमध्ये दिसत आहे. तिने स्लिंग बॅग कॅरी केली होती. न्यूड मेकअप आणि हाफ टाय हेअरमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. पण, त्या फोटोत तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसत होता.

लंडनमध्ये असताना फोटो झाला व्हायरल

करीना कपूर, करिश्मा कपूर आणि त्यांची मैत्रीण अमृता अरोरा त्यांच्यासोबत करीना लंडनमध्ये होती. त्यादरम्यान, करीनाने कुटुंबासोबत लंडन येथील एका व्यक्तीसोबत एक फोटो शेयर केला होता. ज्यामध्ये सैफ देखील दिसत होता. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर कमेंट करत अनेकांनी हा प्रश्न आहे. मात्र यावर करीना किंवा तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. करीनाने शेयर केलेल्या प्रत्येक फोटोत ती आपले पोट लपवत असल्याचे दिसत होती. त्यावरून ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT