Kareena Kapoor and Saif Ali Khan Instagram
मनोरंजन

Kareena Kapoor: 'आमच्या मुलांना 'या' मुळे अटेंशन मिळते' सैफ अन् बेबोचा खुलासा

Kareena Kapoor: आता करिना कपूर आणि सैफ अली खान ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी आपल्या मुलांमुळे चर्चांचा भाग बनली आहेत.

दैनिक गोमन्तक

Kareena Kapoor: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी ते त्यांच्या वक्तव्यांमुळे तर कधी हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता करिना कपूर आणि सैफ अली खान ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी आपल्या मुलांमुळे चर्चांचा भाग बनली आहेत.

करिना आणि सैफ अली खान यांची तैमुर, जेह ही दोन्ही मुलं त्यांच्या जन्मापासूनच चाहत्यांची लाडकी आहेत. सोशल मिडियावर त्यांच्या फोटो आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसते. या कलाकारांबरोबरच त्यांच्या मुलांचेही अनेक चाहते आहेत. यावर सैफ आणि करिनाने खुलेपणाने आपले म्हणणे मांडले आहे.

कलाकारांच्या मुलांना जास्त अटेंशन मिळते कारण लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट असतो. मुलांना खऱ्या अर्थाने प्रेस, पापाराझी आणि मीडीयामुळे जास्त प्रसिद्धी मिळते. जन्मत: ती स्टारची मुले असतात. आमचे असे कधीच प्रयत्न असत नाहीत त्यांना अटेंशन मिळावे मात्र त्यांना ते आपोआप मिळते. द आर्चिज या चित्रपटाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, हा चित्रपट जेव्हा रिलिज झाला तेव्हा यामध्ये काम केलेल्या स्टारकिड्सना मोठ्या प्रमाणात फॉलो केलं गेलं, ते ज्या-ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणचे फोटो काढले गेले.

करिनाने या सगळ्यावर म्हटले की, आजच्या सोशल मिडियाच्या काळात स्टार असा काही प्रकार नसतो. तुमचे ४० मिलियन फॉलोअर्स आहेत, तुमच्या फोटोला ३० हजार लाइक्स मिळाले याचा अर्थ तुम्ही स्टार आहात असा होत नाही. तुम्ही स्टार आहात, हे तुम्हाला तुमच्या कामातून सिद्ध करावे लागते. या मुलांना तर लोकं स्टार बनवतात असंही करिनाने म्हटले आहे. दरम्यान, तैमुर आणि जेह यांचा त्यांच्या जन्मापासूनच एक चाहतावर्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT