Karan Johar leaked Alia Bhatt and Ranveer Singh night out photos @karanjohar/Instagram
मनोरंजन

रणबीरच्या गर्लफ्रेंडसोबत रणवीर सिंग निघाला 'नाईट आउट'ला

करण जोहरने लीक केले आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचे फोटो

दैनिक गोमन्तक

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. सध्या हे दोघेही त्यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे शूटिंग देशाच्या राजधानीत करत आहेत. दिल्लीतील थंडीच्या वातावरणात दोघांचे असे काही फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहते म्हणत आहेत की, हे पाहून रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण या दोघांचाही पारा चढू नये म्हणजे झाल. ही छायाचित्रे इतर कोणी नाही तर खुद्द करण जोहरने लीक केली आहेत.

Karan Johar leaked Alia Bhatt and Ranveer Singh night out photos

'रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी'च्या शूटिंगचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण नुकतेच करण जोहरने रणवीर सिंग आणि आलिया भट्टचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याने चाहत्यांना त्यांच्या नाईट आऊटबद्दल माहिती दिली आहे. फोटोंमध्ये रणवीर आणि आलिया खूपच स्टायलिश लूकमध्ये दिसत आहेत. रणवीर पांढऱ्या टी-शर्ट आणि ब्लॅक ब्लेझरमध्ये पोज देताना दिसत आहे. तर आलिया ओवर साइज कोटमध्ये दिसत आहे.

Karan Johar leaked Alia Bhatt and Ranveer Singh night out photos

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत करण जोहरने कॅप्शनमध्ये 'रॉकी आणि राणी ऑन अ नाईट आऊट!' #rockyaurranikipremkahani #day56 of shoot! #delhishenanigans असे लिहिले आहे. रणवीर आणि आलियाच्या या फोटोंवर अनेक कमेंट येत आहेत. फोटोवर कमेंट करताना आलियाच्या आईने 'आयकॉनिक' असे लिहिले. यासोबतच हार्ट आणि फायरचे इमोजीही शेअर केले आहेत. चाहतेही फोटोवर भरभरून कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Karan Johar leaked Alia Bhatt and Ranveer Singh night out photos

रणवीर आणि आलियाच्या या फोटोंसोबत करण जोहरने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या 'रॉकी आणि रानी'सोबत दिसत आहे. या चित्रपटाद्वारे करण जोहर प्रदीर्घ कालावधीनंतर चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग रॉकीच्या तर आलिया भट्ट राणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Karan Johar leaked Alia Bhatt and Ranveer Singh night out photos

या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया आणि रणवीर सिंगची जोडी दुसऱ्यांदा पडद्यावर दिसणार आहे. याआधी ही जोडी 2019 मध्ये रिलीज झालेल्या झोया अख्तरच्या 'गली बॉय' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT