Dharamendra Dance video Dainik Gomantak
मनोरंजन

Dharmendra Dance Video: नातवाच्या लग्नात आजोबांचा फुलटू डान्स... धर्मेंद्र यांचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल देखील आहेत.

Puja Bonkile

Dharmendra Dance Video: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 

आज त्यांच्या नातू करण देओलच्या लग्नासाठी सज्ज झाले होते. नातवाच्या मिरवणुकीत ते जोरदार नाचताना दिसले. हा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र त्याच्या डॅशिंग स्टाईलमध्ये दिसत आहेत. 

  • सोशल मीडियावर देओल कुंटूबाची जादू

सोशल मीडियावर देओल कुटुंबाची चर्चा सुरु आहे. करण देओलच्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आले आहेत. त्याची मिरवणूक गुरुद्वारापर्यंत पोहोचली. हा विवाह पूर्णपणे पंजाबी रितीरिवाजांनुसार पार पडला आहे. 

सनी, बॉबी, अभय, धर्मेंद्र तसेच संपूर्ण देओल कुटुंब लग्नासाठी खूप उत्सुक दिसत आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

  • धर्मेंद्र यांचा जबरदस्त डान्स

या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र पुढे येतात आणि सनी देओल, बॉली देओल आणि त्याच्या नातवाच्या लग्नात मिरवणुकीत नाचतांना दिसत आहे. त्यांच्या डान्सनंतर मिरवणूक श्री कंदेश्वरी देवी मंदिर संस्थानकडे जाते. 

धर्मेंद्र यांची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यासोबतच देओल कुटुंबीयांचे खूप कौतुक करत आहे. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र यांनी सूट घातलेला दिसत आहे. 

तर सनी देओल आणि बॉबी शेरवानी घातलेले दिसत आहेत. करनेने त्याच्या लग्नासाठी बेज रंगाची शेरवानी देखील घातली होती आणि तो घोड्यावर स्वार होताना छान दिसत होता. 12 जूनपासून धर्मेंद्र यांच्या घरी लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले होते. यांमुळे घरात पाहुण्यांची वर्दळ असते. आज म्हणजेच 18 जून रोजी करण देओल त्याची बालपणीची मैत्रीण द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT