Mamta Kulkarni  Dainik Gomantak
मनोरंजन

Mamta Kulkarni: सलमान खानची करन- अर्जुनमधली अभिनेत्री दिसणार बिगबॉसमध्ये...

Mamta Kulkarni in Big Boss: सलमान खानची एकेकाळची अभिनेत्री ममता कुलकर्णी आता बिग बॉसमध्ये दिसणार आहे.

Rahul sadolikar

Mamta Kulkarni in Big Boss: सलमान खान आणि शाहरुख खानचा करन - अर्जुन हा चित्रपट आठवतोय? या चित्रपटात सलमानच्या अभिनेत्रीचं काम केलेली ममता कुलकर्णी कोण विसरेल.

गेले कित्येक काळ ग्लॅमरपासून दूर असणारी अभिनेत्री आता सलमानच्याच एका शोमधून छोट्या पडद्यावर परतणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ममता कुलकर्णी सध्या केनियामध्ये आहे. भारतीय वंशाच्या उद्योगपती उरू पटेलसोबत त्यांनी तिथे स्वतःची निर्मिती कंपनी सुरू केली आहे.

दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर ममता प्रसिद्धीच्या झोतात आली होती आणि या प्रकरणात ममताचा नवरा असलेल्या विकी गोस्वामीचे नाव समोर आले होते.

ड्रग्जच्या व्यापारात सहभागी असल्याचा आरोप

51 वर्षीय ममता कुलकर्णीने कोणत्याही ड्रग सिंडिकेटमध्ये सहभाग असल्याच्या बातम्या फेटाळल्या असल्या तरी, ती या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि ती ड्रग सिंडिकेटची सक्रिय सदस्य असल्याचा आरोप तिच्यावर अजूनही आहे. ममताला फरार घोषित करण्यात आले आहे. 

ममताची बँक खाती आणि मुंबईतील फ्लॅट सील करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. आणि जर ती भारतात परतली तर तिला अटक होण्याची दाट शक्यता आहे.

वादग्रस्त कारकिर्द

'बिग बॉस 17'च्या निर्मात्यांनी ममता कुलकर्णीशी संपर्क साधल्याची बातमी आहे. ममताला 90 च्या दशकातील वादग्रस्त अभिनेत्री म्हणूनही ओळखले जाते.

तिने मासिकांसाठी टॉपलेस पोज दिली होती आणि तिची बोल्ड वक्तव्येही 90 च्या दशकात बरीच लोकप्रिय झाली होती. 2003 मध्ये तिने अभिनयाला अलविदा केला आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

बिग बॉस 17

'बिग बॉस 17'चा प्रोमो रिलीज झाल्यानंतर, 15 ऑक्टोबरपासून शो सुरू होत असल्याची पुष्टी झाली आहे. रविवारी रात्री 9 वाजता, सलमान खान पुन्हा एकदा कलर्स चॅनलवर होस्ट म्हणून दिसणार आहे आणि या सीझनच्या स्पर्धकांचे स्वागत करणार आहे. 

जर तुम्हाला हा शो OTT वर पाहायचा असेल, तर यावेळी तो Voot ऐवजी Jio सिनेमावर स्ट्रीम होईल. 

'बिग बॉस ओटीटी सीझन 2' प्रमाणे, ज्याचा विजेता एल्विश यादव आहे. कलर्स चॅनलवर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता आणि शनिवार-रविवार रात्री ९ वाजता तुम्ही ते पाहू शकाल.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT