Nagbhushan Car Accident  Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेत्याच्या कारच्या धडकेत महिलेला जागीच मृत्यू

कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारच्या धडकेत 48 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

Rahul sadolikar

actor Nagbhushan Car Accident : मनोरंजन विश्वातून एक धक्कादाक माहिती समोर आली आहे. कन्नड अभिनेता नागभूषण याच्या कारचा अपघात झाला आहे. नागभूषणच्या कारने एका जोडप्याला दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दक्षिण बेंगळुरूमध्ये झाला अपघात

दक्षिण बेंगळुरूमधील वसंतपुरा मुख्य रस्त्यावर शनिवारी रात्री कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने धडक दिल्याने एका 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा पती गंभीर जखमी झाला. वसंतपुरा येथील रहिवासी प्रेमा कृष्णा असे पोलिसांनी मृत महिलेची ओळख सांगितली. 

रात्रीच्या सुमारास झाला अपघात

30 सप्टेंबरच्या रात्री 9.50 च्या सुमारास प्रेमा आणि कृष्णा हे जोडपं एका फूटपाथवरून चालले होते, तेव्हा नागभूषण यांच्या कारने त्यांना धडक दिली. 

विजेच्या खांबाला धडकल्यानंतर कार थांबली. अभिनेत्याने जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, जिथे प्रेमाचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी नागभूषणाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

पीडितेचा मुलगा पार्थ म्हणाला

या अपघातात मृत पावलेल्या पार्थ म्हणाला, “मी एका कंपनीत काम करतो आणि माझे आई-वडील माझ्यासोबत राहतात. 

30 सप्टेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास मी कनकापुरा रोडवर होतो तेव्हा मला माझ्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने मला सांगितले की माझ्या आई-वडिलांचा अपघात झाला आहे. त्यांनी सांगितले की एका कारने दोघांना धडक दिली.”

मृत महिलेचा मुलगा म्हणाला

अपघाताची माहिती देताना पार्थ पुढे म्हणाला "मी हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी सांगितले की माझ्या आईच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हॉस्पिटलमध्ये जाताना तिचा मृत्यू झाला," .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT