Kangana will essay the role of former Prime Minister Indira Gandhi in an upcoming political drama 
मनोरंजन

जयललिता नंतर इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासाठी कंगना रणौत सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा

मुंबई: आपल्या चित्रपटांपेक्षा बर्‍याचदा चर्चेत राहिलेली कंगणा रनौत  कदाचित खऱ्या आयुष्यात कॉंग्रेस पक्षाला विरोध करत असतील, पण आता ती कॉंग्रेसच्या नेत्याच्या भमिकेत पडद्यावर दिसणार आहे. कंगनाला एका राजकीय नाटक चित्रपटासाठी साइन केले गेले आहे ज्यात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर कंगन रनौत सोशल मीडियावर ट्रोल होत आहे .

कंगनाने दिलेल्या निवेदनानुसार, 'हो, आम्ही या प्रकल्पावर काम करत आहोत आणि चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे. हा इंदिरा गांधींचा बायोपिक नाही तर एक राजकीय नाटक आहे जो आपल्या पिढीला आजच्या भारताची सामाजिक-राजकीय परिस्थिती समजावण्यास मदत करणार आहे. कंगना या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे. हा चित्रपट आपत्कालीन ऑपरेशन ब्लू स्टारवर आधारित असणार आहे. यात काही मोठे कलाकार काम करणार असल्याचे कंगनाने सांगितले आहे. ती म्हणाली की, "आपल्या भारतीय राजकारणातील सर्वात आइकॉनिक नेत्याची भूमिका साकारतांना मला खूप आनंद होत आहे." या चित्रपटाची कथा आणि पटकथा दिग्दर्शक साई कबीर यांनी लिहिली आहे, ज्यांनी यापूर्वी 'रिव्हॉल्व्हर राणी' चित्रपटात कंगनाच्या सोबत काम केले होते.

मात्र, ही बातमी समजताच लोक कंगना रनौत यांना ट्रोल करत आहेत. वास्तविक, जिवनात कंगना रनौत भाजपला पाठिंबा देतांना दिसते, अशा परिस्थितीत ती कॉंग्रेस नेत्याची भूमिका साकारणार हे ऐकून लोक तिची चेष्टा करत आहेत. कंगनाचा  पुढचा चित्रपट 'थलाइवी' रिलीज होणार आहे ज्यामध्ये ती जयललिताच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती 'तेजस'मध्ये भारतीय वायुसेनेची लढाऊ पायलट आणि 'धाकड'मध्ये एक सीक्रेट सर्विस एजेंट म्हणून दिसणार आहे. या व्यतिरिक्त तीने नुकताच मणिकर्णिकाचा सिक्वल 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा' बनवण्याचीही घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

Power Outages in Goa: गोव्‍यात दिवसाला 37 वेळा वीजपुरवठा खंडित, पहा Video

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

SCROLL FOR NEXT