Kangana Ranaut Troll Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranaut Troll on Social Media: डोनाल्ट ट्रम्प यांचे ट्विटरवर कमबॅक, पण कंगना झाली ट्रोल

Kangana Ranaut Troll: सोशल मिडियावर या कारणामुळे कंगना प्रचंड ट्रोल होत आहे.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ट ट्रंप यांची ट्विटरवर वापरसी झाली आहे. ट्विटरचा नवा मालक एलन मस्कने रविवारी सकाळी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्रंप यांचे ट्विटर अकाऊंट रिस्टोर केले जात आहे. दरम्यान, अनेकांनी एलन मस्कला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या ट्विटर अकाऊंटविषयी विचारण्यास सुरुवात केली आहे. 'कंगना रणौतने तुमचे काय बिघडले आहे?' असा प्रश्न अनेकांनी एलन मस्क यांना विचारला आहे.

डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांचे 2021 मध्ये ट्विटर (Twitter) अकाऊंट बॅन करण्यात आले होते. त्यापाठोपाठ कंगना रणौतचे देखील अकाऊंट बॅन करण्यात आले. गेल्या वर्षी कंगनाने 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिने, 'ते आता वॅली झाले आहे. मी कोरोना काळात सहा महिने ट्विटर जॉइन केले होते आणि नंतर मला बॅन करण्यात आले' असे म्हटले होते.

ट्रंप यांना ट्विटरवर पुन्हा आलेले पाहून भारतात (India) कंगना रणौतला ट्रोल केले जात आहे. अनेकजण कंगनाने तुमचे काय बिघाडले आहे असा प्रश्न एलन मस्कला विचारला जात आहे. एका यूजरने, 'क्वीन पूर्ण दिवस ट्विटरवर ट्रोल होत आहे' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने, 'ट्रंप यांना ट्विटरवर पाहून कंगना विचार करत असेल की माझा नंबर कधी येणार' असे म्हटले आहे.

2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसेवर कंगना रणौतने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बिनधास्तपणे त्याचे मत मांडले होते. त्या प्रकरणाला कंगनाने टीएमसीला जबाबदार ठरवले होते. त्यानंतर कंगनाचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT