Kangana Ranaut  Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranaut: '...तरी मी लग्नात डान्स केला नाही' अनंत अंबानीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांवर कंगनाचे ताशेरे

Kangana Ranaut: या कार्यक्रमात बॉलीवूडपासून ते हॉलीवूडमधील अनेक कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranaut talking about dance at wedding indirectly commenting bollywood celebrities

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात बॉलीवूडपासून ते हॉलीवूडमधील अनेक कलाकार सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता बॉलीवूडची क्वीन कंगना रणौतने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

तिने म्हटले आहे की- 'मी खूप आर्थिक संकटाचा सामना केला आहे. पण मला पैशाचे कितीही आमिष दाखवले तरी, मी लग्नसोहळ्यात कधीच डान्स केला नाही.अनेक सुपरहिट आयटम साँगही मला ऑफर केले गेले, मी अवॉर्ड शोपासूनही दूर असते. लताजी आणि मी असे दोनच लोक आहोत ज्यांची गाणी सर्वाधिक हिट झाली आहेत. प्रसिद्धी आणि पैशाला नाही म्हणायला प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठा लागते. शॉर्टकटच्या जगात, आजच्या तरुणांना हे समजून घेणे आवश्यक आहे की केवळ तोच पैसा कमावता येतो जो प्रामाणिकपणाचा आहे.

kangana Ranuat

मात्र असे वक्तव्य करताना कंगनाने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांवर ताशेरे ओढले असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान अनेक कलाकारांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. विशेषत: सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे तिन्ही खान स्टेजवर जेव्हा एकत्र आले तेव्हा उपस्थितांनी आनंद व्यक्त केला होता. तसेच सोशल मिडियावदेखील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT