Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranauat: 'मला तुमच्या चित्रपटात रोल देऊ नका, नाहीतर...'अ‍ॅनिमलच्या दिग्दर्शकाला कंगनाने स्पष्टच सांगतिलं

Kangana Ranaut: मात्र कंगनाने पुन्हा एकदा त्याच्यावर जोरदार टीका करत सल्लादेखील दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranaut: संदीप वंगा रेड्डी हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अॅनिमल या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला असला तरी मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता कंगना आणि दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांच्यात आता शाब्दिक वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

संदीपचा चित्रपट आला तेव्हा कंगनाने अॅनिमल चित्रपटावर टीका केली होती. असे असतानाही संदीपने नुकतेच या अभिनेत्रीचे कौतुक केले आणि तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र कंगनाने पुन्हा एकदा त्याच्यावर जोरदार टीका करत सल्लादेखील दिला आहे.

संदीप वंगा रेड्डी यांनी आपल्या एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे की, 'मी कंगनाचे क्वीन आणि इतर चित्रपट पाहिले आहेत. तिचा अभिनय उत्तम आहे. जर माझ्याकडे कंगनासाठी रोल असेल तर मी तिला नक्कीच ऑफर करेन' असे म्हटले होते.

त्यावर आता कंगनाने ट्विट करत पुन्हा एकदा शाब्दिक समाचार घेताला आहे. ती म्हणते- समीक्षा आणि निंदा एक असू शकत नाही, प्रत्येक कलेसारखीच या कलेचीदेखील समीक्षा आणि चर्चा होणे आवश्यक आहे. संदीपजींनी माझी समीक्षा करताना माझ्याप्रति आदरभाव व्यक्त केला. ते फक्त पुरुषसत्ताक चित्रपट बनवत नाहीत. त्यांचे वागणेदेखील तसेच आहे. कृपया सर मला कोणताही रोल देऊ नका, नाहीतर तुमचे अल्फामेल हीरोज फेमिनिस्ट होतील आणि तुमचे चित्रपट चालणार नाहीत. तुम्ही ब्लॉकबस्टर चित्रपट बनवा फिल्म इंडस्ट्रीला तुमची गरज आहे असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता कंगनाच्या या ट्वीटवर संदीप वंगा रेड्डी काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "चिमुकल्यांचे हात-पाय बांधून अमानुष छळ!" डेकेअर सेंटरचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी 13 जणांना ठोकल्या बेड्या

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT