Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

विक्रांत मेस्सी ला कॉकरोच म्हणणाऱ्या कंगनाने लग्नासाठी केलं अभिनंदन

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने (Kangana Ranaut) नुकतेच लग्नबंधनात अडकलेल्या विक्रांत मॅसी आणि शीतल ठाकूरला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने नुकतेच लग्नबंधनात अडकलेल्या विक्रांत मॅसी आणि शीतल ठाकूरला शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने गेल्या वर्षी सोशल मीडियावर विक्रांतला कॉकरोच म्हटले होते, जेव्हा त्याने लग्नाच्या फोटोवर वक्तव्य करताना यामी गौतमला राधे माँ म्हणून संबोधले होते. विक्रांतने (Vikrant Massey) यामीला राधे माँ म्हटल्यावर अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) चांगली भडकली होती. (Kangana Ranaut Has Congratulated Vikrant Massey And Sheetal Thakur On Their Marriage)

दरम्यान, इंस्टाग्रामवरील (Instagram) एका अकाऊंटवरुन फोटोंचा कोलाज शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये यामी गौतमचा लाल कपलमधील फोटो पाहिल्यानंतर विक्रांतने तिला राधे माँ म्हटले होते.

खरं तर, गेल्या वर्षी यामी गौतमच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करताना विक्रांतने तिची तुलना राधे माँशी केली होती. यामीच्या फोटोवर कमेंट करताना विक्रांतने लिहिले होते की, राधे माँसारखे तु शुद्ध आहेस. त्याचवेळी विक्रांतच्या या कमेंटवर प्रतिक्रिया देताना कंगनाने लिहिले की, 'हे कॉकरोच कुठून आले, माझी चप्पल आणा कुणीतरी.'

तसेच, आता नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टचे कॅप्शनमध्ये कंगनाने पुन्हा बरळली आहे. विक्रांत मॅसीचे अभिनंदन... आशा आहे की, कोणीही तुझ्या पत्नीची तुलना राधे माँसोबत करणार नाही. या पोस्टवर कमेंट करताना कंगनाने लिहिले - होय, विक्रांत मॅसी ज्याने हिमाचली मुलीशी लग्न केले आहे. जे चांगले आहे. तुम्हा दोघांना सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT