Bollywood actress Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

'Thalavi' आणि 'धाकड' साठी कंगना राणावतचे ट्रान्सफॉरमेशन; फोटो पाहून धक्का बसेल

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर (Social media) खूप अ‍ॅक्टिव असते. अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट बर्‍याचदा चर्चेत असते.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर (Social media) खूप अ‍ॅक्टिव असते. अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट बर्‍याचदा चर्चेत असते. कंगना चाहत्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चित्रपटाशी संबंधित सर्व अपडेट्स देते. सध्या अभिनेत्री तिच्या आगामी ‘धाकड’ (Dhaakad) चित्रपटाचे विदेशात शुटिंग करत आहे आणि यादरम्यान अभिनेत्री इन्स्टाग्रामवर सेटवरून काही अनसीन फोटो आणि व्हिडिओ सातत्याने शेअर करत आहे, जे प्रचंड व्हायर देखील होत आहे. पण अलीकडेच कंगनाने एक पोस्ट शेअर केले आहे जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या ताज्या पोस्टमध्ये आपण कंगनाचे दोन रूप पाहू शकतो. जे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत.(Kangana Ranaut did a tremendous transformation from Thalaivi to Dhaakad)

कंगनाने दोन वेगवेगळ्या चित्रपटांच्या लूकचा कोलाज शेअर केला आहे. या कोलाजमध्ये कंगना एका बाजूला 'थलाइवी' (Thalaivi) स्टाईलमध्ये दिसली आहे, तिने हलका तपकिरी रंगाचा डान्सिंग आउटफिट परिधान केला आहे तर दुसरीकडे कंगनाने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहे ज्यासह तिने काळ्या रंगाचे बूट घातले आहेत. एका फोटोमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की एका लुकमध्ये कंगनाचे वजन खूप वाढले आहे आणि दुसर्‍या लूकमध्ये कंगना खूपच फिट आणि फाइटर दिसत आहे.हा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले आहे की, 'थलावी आणि धाकडची' यात्रा.

कंगनाचा थलाइवी हा चित्रपट बर्‍याच चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून त्याची खूप प्रशंसा झाली. कंगनाचा हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांचे बायोपिक आहे. जयललिता ही दक्षिण सिनेमाच्या सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक होती. थलाइवी चित्रपटात कंगना राणावत जे जयललिताच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, कंगना 'धाकड' मध्ये एक फाइटर गर्ल म्हणून दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय कंगनाचा 'तेजस' चित्रपटही चर्चेत आहे.

दरम्यान रविवारी हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनात अनेक जणांचा बळी गेला. या अपघातात डॉ. दीपा शर्मा या कंगनाचा चाहता मरण पावला, यामुळे अभिनेत्री खूप दु: खी आहे. कंगनाने सोशल मीडियावर दीपाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारे एक पोस्ट लिहिले होते. तिने लिहिले, 'ती एक उत्तम फॅन होती. ती मला नेहमीच गोड अक्षरे, भेटवस्तू आणि मिठाई पाठवत असे. ती मनालीतील माझ्या घरीही आली होती. अरे !! हा एक मोठा धक्का आहे, हे विश्वासाच्या पलीकडे आहे, अरे देवा!'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT