Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranauat: अन् शेवटी कंगनाचा हृतिक चाहत्यांसमोर आलाच!

Kangana Ranauat: दोघांची जोडी छान दिसत असल्याचेही चाहत्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranauat: बॉलीवूडचे कलाकार कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे कधी ते त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चांचा भाग बनतात.

आता कंगना रणौतदेखील एका मिस्ट्री मॅनमुळे ती चर्चेत आली आहे. कंगनाने ज्याचा हात धरत पापाराझींसाठी पोझ दिली तो व्यक्ती कोण आहे? तो तिचा बॉयफ्रेंड आहे का ? असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांना पडलेले असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.

कंगनाचे 'मिस्ट्री मॅन'सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका पापाराझीनेही हे इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या आणि यूजर्सच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येकाला या 'मिस्ट्री मॅन'बद्दल जाणून घ्यायचे आहे. काहीं या व्यक्तीला हृतिक रोशन म्हणत लिहिले की कंगनाला शेवटी हृतिकसारखा दिसणारा कोणीतरी सापडला आहे. चाहत्यांनी या जोडीचे कौतुक करत कंगनासाठी आनंदी असल्याचे सांगितले. दोघांची जोडी छान दिसत असल्याचेही चाहत्यांनी म्हटले आहे.

आता कंगना स्वत: त्या व्यक्तीबद्दल सांगणार का असा प्रश्नही चाहत्यांना पडताना दिसत आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगना रणौत सध्या तिच्या 'इमर्जन्सी' या नवीन चित्रपटात व्यस्त आहे, ज्यामध्ये ती केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शिका देखील आहे. आधी हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये रिलीज होणार होता, पण आता तो 2024 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक आणि श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT