Kangana Ranauat Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranauat: 'तो कंगनाचा हृतिक नाहीच...?' मिस्ट्रीमॅनबद्दल अभिनेत्रीची सोशल मिडियावर पोस्ट

Kangana Ranauat: आता मात्र कंगनाने आपल्या सोशल मिडियावर या चाहत्यांच्या या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranauat: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच चर्चेत असताना दिसतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे ही कलाकार मंडळी चर्चेत असतात. आता कंगना रणौत एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली होती.

कंगनाला एका अनोळखी व्यक्तीबरोबर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कंगनाला तिचा हृतिक मिळाल्याचे म्हणत या जोडीचे कौतुक केले होते. तसेच हा मिस्ट्री मॅन कोण आहे असा प्रश्नही चाहत्यांनी विचारायला सुरुवात केली होती.

आता मात्र कंगनाने आपल्या सोशल मिडियावर या चाहत्यांच्या या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. एक पोस्ट शेअर करत कंगनाने लिहिले की, 'मला त्या मिस्ट्री मॅनबद्दल खूप कॉल आणि मेसेज येत आहेत ज्याच्यासोबत मी अनेकदा सलूनच्या बाहेर फिरते, तो माणूस कोण आहे. एक स्त्री आणि पुरुष एकत्र रस्त्यावर चालत आहेत, याचा अर्थ ते रिलेशनशिपमध्ये आहेत असा होत नाही. ते सहकर्मचारी असू शकतात, भावंडे, मित्र किंवा फक्त हेअरस्टायलिस्ट आणि वर्षानुवर्षे मैत्रीपूर्ण ग्राहक असू शकतात.' अशा शब्दात त्या फोटोवर कंगनाने लिहले आहे.

Kangana Ranauat

दरम्यान, कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित इमर्जन्सी या चित्रपटात दिसणार आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटात ती अॅक्टिंगबरोबरच दिग्दर्शनदेखील करताना दिसणार आहे. याबरोबरच, आयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेकांना निमंत्रणे पाठवली जात आहे. कंगना रणौतदेखील इतर अनेक कलाकारांसोबत या कार्यक्रमात सामील होताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT