Kangana Ranauat Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranauat: एकेकाळी विक्रांत मेस्सीला कंगनाने म्हटले होते झुरळ, 12वी फेल पाहिल्यावर म्हणाली 'हा तर इरफान...'

Kangana Ranauat: ती विक्रांत मेस्सीची फॅन झाली असल्याचे तिने केलेल्या सोशल मिडियावरील पोस्टवरुन पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranauat: कंगना रणौत कधी आपल्या चित्रपटांमुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता तिने 12th फेल या चित्रपटाचे कौतुक केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

विक्रांत मेस्सी स्टारर '12 वा फेल' नुकताच OTT वर रिलीज झाला आहे, या चित्रपटाला लोकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विधू विनोद चोप्रांचा हा चित्रपट पाहिल्यानंतर १२वी फेल म्हणजे 'मास्टरपीस' असल्याचे अनेकजण म्हणत आहेत. कंगना रणौतनेही नुकताच हा चित्रपट पाहिला आणि ती विक्रांत मेस्सीची फॅन झाली असल्याचे तिने केलेल्या सोशल मिडियावरील पोस्टवरुन पाहायला मिळत आहे.

चित्रपट पाहिल्यानंतर कंगनाने विक्रांतचे तसेच दिग्दर्शक विधू विनोद चोप्राचे कौतुक केले. कंगनाने विक्रांतची तुलना दिवंगत अभिनेता इरफान खानशी केली आहे. '12वी फेल' पाहिल्यानंतर कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर काही पोस्ट केल्या. यात तिने विक्रांत मॅसी आणि विधू विनोद चोप्रा यांचे कौतुक करत लिहिले की, 'विधू सरांनी पुन्हा एकदा माझे मन जिंकले आहे. विक्रांत मॅसी अप्रतिम अभिनेता आहे. येत्या काही वर्षांत तो इरफान खानची पोकळी भरून काढू शकतो, असे कंगनाने सोशल मिडियावर म्हटले आहे.

Kangan ranauat social media post

विक्रांत मेस्सीला म्हटले होते 'झुरळ'

कंगना राणौतने एकदा विक्रांत मेस्सीला 'झुरळ' म्हटले होते.अभिनेत्री यामी गौतमने लग्नानंतरचा स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यावर विक्रांतने 'राधे माँच्या प्रति एकदम शुद्ध' अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर कंगनाने लिहिले होते की, 'हे झुरळ कुठून आले, माझी चप्पल आणा.'

'12वी फेल'ने 'तेजस'ला मागे सारत बॉक्स ऑफिसवर केला होता धुमाकूळ

12वी फेल हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यासोबतच कंगना राणौतचा 'तेजस'ही रिलीज झाला. सुमारे 20 कोटी रुपयांच्या बजेटसह बनलेल्या '12वी फेल'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 53.88 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरात 67 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. कंगना राणौतचा 'तेजस' चांगलाच फ्लॉप झाला.

सलमान खानचा 'टायगर 3' रिलीज झाल्यानंतरही '12वी फेल' चित्रपटगृहांमध्ये राहिला आणि करोडोंची कमाई सुरूच ठेवली. आता हा चित्रपट OTT वर आल्यापासून लोक त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

कंगना आता या वर्षी 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे, ज्याचे तिने दिग्दर्शनही केले आहे. याशिवाय ती एका सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्येही दिसणार आहे. तर विक्रांत मॅसी 'यार जिगरी', 'सेक्टर 36', 'फिर आयी हसीन दिलरुबा' आणि रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT