Kajol Dainik Gomantak
मनोरंजन

Kajol Upcoming Web Series: काजोल म्हणते- जेव्हा मी यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते, तेव्हा मी काम थांबवलं कारण...

Kajol: काजोल एका व्हिडिओमध्ये हे म्हणणं सोपं नाहीए मात्र मला कामाची गरज आहे , असं म्हणताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Kajol: 90 च्या दशकात ज्या अभिनेते आणि अभिनेत्रींनी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य केले असे काही सितारे आजही वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत असतात. आता अशाच एका अभिनेत्रीच्या पून्हा एकदा मोठी चर्चा होताना दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजेच काजोल होय. काजोल आता वेब सीरीजच्या माध्यमातून पून्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

द ट्रायल या तिच्या आगामी वेब सीरीजमध्ये ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका व्हिडिओमध्ये काजोल या वेबसीरीजविषयी प्रेक्षकांच्या मनात औत्सुक्य निर्माण करण्यासाठी हे म्हणणं सोपं नाहीए मात्र मला कामाची गरज आहे असं म्हटलंय.

काजोल या वेबसीरीजमध्ये नयनिका या व्यक्तीरेखेमध्ये दिसून येणार आहे. ती एका आईची आणि एका वकीलाच्या व्यावसायिक आयुष्यात समतोल साधताना दिसणार आहे. बऱ्याच काळानंतर काजोल भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षक काजोलला नव्या भूमिकेत पाहण्यास उत्सुक आहेत.

काजोल या नव्या प्रवासाविषयी म्हणते, या नवीन पीढीबरोबर काम करताना कधीकधी टेंशन वाटते मात्र स्वतावर विश्वास आहे. जेव्हा मी माझ्या करिअरच्या सर्वोच्च स्थानावर होते, तेव्हा मी इंडस्ट्रीमधून ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला. मोठमोठ्या ऑफर सोडल्या आणि पूर्ण वेळ आईचा जॉब स्विकारला. आता पून्हा नव्याने इंडस्ट्रीमध्ये येत आहे. मागचा अनुभव आहे, नवीन स्कील आहेत त्यामुळे पून्हा जोमाने काम करेन असे काजोल म्हणते. आता तीची ही नवीन वेब सीरीज आणि नवीन अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pro Kabaddi League Final 2025: दबंग दिल्ली पुन्हा कबड्डी 'चॅम्पियन'! जिंकला PKL 12चा किताब; फायनलमध्ये पुणेरी पलटनची कडवी झुंज अपयशी

Raigad Fort: मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी; 'किल्ले रायगड'

Kuldeep Yadav Record: परदेशी मैदानांवर कुलदीपची 'जादू'! चहलला पछाडून बनला 'नंबर 1' भारतीय गोलंदाज; ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधली किमया VIDEO

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT