Kacha Badam Bhuban Badyakar Dainik Gomantak
मनोरंजन

Kacha Badam Singer Tragedy : "माझंच गाणं आता मला गाता येत नाही"! 3 लाखांच्या नादात गायकाने 'कच्चा बादाम' कायमचं गमावलं.

फक्त 3 लाख रुपयांच्या मोबदल्यात या गायकाच्या पदरी आयुष्यभराची निराशा आली आहे

Rahul sadolikar

इन्स्टाग्रामवर दोन वर्षांपूर्वी एका गाण्याने धुमाकूळ घातला होता. जिकडे बघाव तिकडे याच गाण्याचं चॅलेंज. लहान, तरुण- तरुणी, मध्यमवयीन सगळ्यांना या गाण्याने वेड लावलं होतं. या गाण्याचा गायक एक अत्यंत गरीब बादाम विकणारा विक्रेता होता.

या गायकाचं नाव आहे भुबन. या गाण्यामुळे तो एकदम स्टार झाला. या गाण्याने त्यांना नाव आणि पैसा दिला ;पण आता तेच त्यांचं गाणं त्यांनी कायमचं गमावलं आहे. 

ज्या गाण्याने प्रसिद्धी मिळवून दिली, आता तेच गाणे त्यांना गाता येत नाही. भुबनने 'कच्छा बदम' गाण्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच या गाण्यावर कॉपीराइट स्ट्राइक येतो. असं त्यांचं मत आहे.

खरे तर त्याने आपले गाणे गोपाल नावाच्या व्यक्तीला ३ लाखांना विकले होते. आता या गाण्याचा कॉपीराइट गोपालकडे गेला आहे. त्यामुळे भुबनला स्वतःचे गाणे गाता येत नाही. तो गाणे सोशल मीडियावर अपलोड करताच त्याच्यावर कॉपीराईट क्लेम येतो.

आता मुद्दा असा आहे की गोपालने भुबनला दिलेले 3 लाख रुपये 'कच्छा बदाम'च्या कॉपीराइटसाठी होते, असे गोपाल सांगतात. 

तीन लाख रुपये देताना त्यांनी काही कागदावर सही केली होती. आता भुबनला वाचायला येत नाही. म्हणूनच त्यांनी सही केली. आणि त्यातच ते अडकले. 

'कच्छा बदाम' गाताना भुबन रातोरात व्हायरल झाला. त्याला शो येऊ लागले. या गाण्याचा एक शुशन टाईप व्हिडिओही आला होता. चांगली कमाई होऊ लागली. यानंतर त्यांनी गावातील घर बांधण्याचा विचार केला. मात्र ते पुन्हा जुन्या आयुष्यात परतत आहेत. 

त्यांच्या घरची कामं ठप्प झाली आहेत. आता भुबनला भिती वाटत आहे की, कॉपीराईटचे हे प्रकरण असेच चालू राहिले तर पुढे त्याचे घर कसे चालेल? त्यांना पुन्हा उदरनिर्वाहाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

हे सांगताना भुबन भावूक झाले आणि रडू लागले. मिळालेल्या माहितीनुसार गोपाल नावाच्या व्यक्तीविरोधात कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. 

दुबराजपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सांगतात की, कराराच्या कागदपत्रांसह भुबनला अनेकदा पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. पण तो आला नाही. ते आले, तक्रार आली, तर चौकशी सुरू होईल.

कच्छा बदाम' हे गाणे भुबन बड्याकर यांची स्वत:ची निर्मिती होती . तो पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी आहे. भुबन दुचाकीवरून गावोगाव फिरून शेंगदाणे म्हणजेच कच्चे बदाम विकायचे. 

नवीन गावात पोहोचल्यावर 'कच्छा बदाम'ची जिंगल गाऊन लोकांना हाक मारायची. त्यांचे हे गाणे लोकसंगीत आहे. पैशांसोबतच तो घरातील तुटलेल्या वस्तू आणि बांगड्यांच्या बदल्यात बदाम विकायचे. भुबनचे हे गाणे नोव्हेंबर 2021 मध्ये सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झालं. त्याचं गाणं कोणी व्हायरल केलं हेही त्यांना माहीत नव्हतं. 

भुबन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "एक व्यक्ती आला आणि त्याने माझ्या गाण्याचे कौतुक केले. त्यानंतर त्या व्यक्तीने माझा व्हिडिओ बनवला. मी त्या माणसाचे नावही विचारले नाही. कारण मी माझ्या कामात व्यस्त होतो". 

नझमू रीचत एक गायक आणि संगीतकार आहे. त्याने बीट्स जोडून हे गाणे रिमिक्स केले. मग कोणीतरी त्या गाण्याची कोरिओग्राफी केली. यानंतर इंस्टाग्रामवर 'कच्छा बदाम डान्स चॅलेंज' सुरू झाले. आणि ते गाणे व्हायरल झाले. यानंतर या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

Viral Video: पोलीस, बँड-बाजा आणि वरात! अशी अनोखी 'लव्ह मॅरेज' पाहून अख्खी वस्ती नाचली; व्हिडिओ पाहून नेटकरीही म्हणाले...

Odisha Crime: हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले 'फेव्हिक्विक', वर्गमित्रांच्या कृत्यानं उडाला थरकाप

Hardik Pandya Record: भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पांड्या रचणार इतिहास, चहलचा विक्रम धोक्यात; फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर शेक् रेस्टॉरंट; पर्यटन खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT