Bollywood actress Juhi Chawla Dainik Gomantak
मनोरंजन

Juhi Chawla: अन् म्हणून माधूरी दिक्षित सोबत काम करण्यास अभिनेत्रीने दिला होता नकार

Juhi Chawala: हे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. त्यामुळे करिश्मा कपूरच्या स्टारडमला मी जबाबदार असल्याचे जुहीने म्हटले होते.

दैनिक गोमन्तक

Juhi Chawala: 90 च्या दशकातील अभिनेत्री जुही चावलाने 1986 मध्ये 'सुलतानत' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले, ज्यात 'कयामत से कयामत तक', 'राजू बन गया जेंटलमन', 'लुटेरा', 'हम हैं राही प्यार के'सह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. आता अभिनेत्रीने खुलासा केला की तिने 'दिल तो पागल है'मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्यास का नकार दिला होता.

जुही चावलाने 13 नोव्हेंबरला तिचा 56 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांची रेडिफवरील जुनी मुलाखत व्हायरल झाली. जिथे ती त्या चित्रपटांचा संदर्भ देत आहे जे तिने करण्यास नकार दिला आणि जे नंतर ब्लॉकबस्टर हिट ठरले.

जुही आणि माधुरीने 'गुलाब गँग'मध्ये एकत्र काम केले होते. मुलाखतीत जुहीने सांगितले की, 'दिल तो पागल है'मध्ये अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली होती, पण तिने ही ऑफर नाकारली होती.

जुही चावलाने खुलासा केला की, 'त्यावेळी मला माधुरीसोबत सेकंड लीडची भूमिका करायची नव्हती. त्यावेळी मी वेगळ्याच जगात होता, जिथे तुम्ही मूर्खासारखे निर्णय घेता. जुहीने सांगितले की, तिने 'राजा हिंदुस्तानी' आणि 'जुदाई' देखील नाकारले होते. हे सर्व चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. त्यामुळे करिश्मा कपूरच्या स्टारडमला मी जबाबदार असल्याचे जुहीने म्हटले होते.

जुहीने मुलाखतीत पुढे सांगितले की, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, मनीषा कोईराला, रवीना टंडन आणि ती त्यावेळी प्रतिस्पर्धी होत्या आणि हे शत्रुत्व काही वर्षे चालू राहिले. काही प्रसंगीच आम्ही भेटायचो. जिथे फक्त हाय-हॅलो होते. त्यापेक्षा जास्त काही नाही. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाने फक्त सोलो हिरोईनसोबतच चित्रपट केले आहेत. दोन नायिका एकत्र काम केल्याचं फार क्वचित घडतं होतं याचे कारण म्हणजे सतत तुलना व्हायची.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

SCROLL FOR NEXT