Nandamuri Taraka Ratna passes away Dainik Gomantak
मनोरंजन

Nandamuri Taraka Ratna passes away: ज्युनियर एनटीआरच्या भावाचं निधन, 39व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर याचा भाऊ आणि तेलुगु देसम पक्षाचे नेते नंदामुरी तारक रत्न यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर याचा भाऊ आणि तेलुगु देसम पक्षाचे नेते नंदामुरी तारक रत्न यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. राजकारणी असण्यासोबतच तारक रत्न अभिनेता देखील होते. त्यांच्या निधनामुळे साऊथ मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अल्लू अर्जुन, चिरंजीवी यांच्याआहा अनेक कलाकार आणि चाहते तारक रत्न यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

तारक रत्न यांना एका रॅलीत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला ते अचानक बेशुद्ध झाल्याचे बोलले जात होते, मात्र नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले, त्यानंतर ते कोमात गेले.

अभिनेते तारक रत्न त्यांचे चुलत भाऊ नारा लोकेश यांच्या पदयात्रेत सामील होण्यासाठी आला होता. यादरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले आणि तत्काळ अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल 23 दिवस त्यांच्या हा संघर्ष सुरू होता. 27 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. अखेर शनिवारी 18 फेब्रुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ सुधाकर के यांनी तेलुगू अभिनेता नंदामुरी तारका रत्न यांच्या निधनाबद्दल ट्विट करत शोक व्यक्त केला.

तारक रत्न हे दिग्गज अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नंदामुरी तारक रामाराव यांचे नातू आहेत. तारक रत्न यांनी 2003 मध्ये आलेल्या 'ओकाटो नंबर कुर्राडू' या चित्रपटातून (Movie) आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. याशिवाय त्यांनी ओटीटीवरही धमाकेदार पदार्पण केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT