Johnny Lever Dainik Gomantak
मनोरंजन

Johnny Lever: 'मी जीव देण्याचा...' जॉनी लिवर यांनी सांगितली आयुष्यातली 'ती' कटू आठवण

Johnny Lever: शूटिंगदरम्यानही लोक मला त्याच्यापेक्षा चांगले ओळखत होते.

दैनिक गोमन्तक

Johnny Lever: काही कलाकार हे त्यांच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. असे कलाकार नेहमीच मुख्य भूमिकेत दिसतील असे नाही, कधी ते सहकलाकारच्या भूमिकेतून, कधी खलनायकाच्या भूमिकेतून कधी कॉमेडियन म्हणून आपल्या अनोख्या अंदाजातून प्रेक्षकांचे मन जिंकतात. अशाच कलाकारांपैकी एक जॉनी लिवर आहेत. बॉलिवूडच्या दिग्गज विनोदी कलाकारांपैकी एक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्याने नुकत्याच यूट्यूबर रणवीर अल्लाबदियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. आपल्या संघर्षाच्या काळाबद्दलदेखील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ते रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यास गेले होते, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात- 'वयाच्या १३ व्या वर्षी मी रेल्वे रुळांवर आत्महत्या करायला गेलो होतो. मी माझ्या वडिलांना कंटाळलो होतो. आत्महत्येचा विचार डोक्यात आल्याने मी रुळावर गेलो, समोरून एक ट्रेन येत होती, अचानक माझ्या डोळ्यासमोर माझ्या तीन बहिणी समोर आल्या. त्यांचे काय होईल असा विचार करून मी तिथून निघून आलो.'

जॉनी म्हणाला, 'लहानपणी कठीण प्रसंग आले. माझ्या लहानपणी मला माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मी काही काम केले तर जेवण घरी शिजत असे. माझ्या वडीलांना ते काय करतात हे त्यांना कळत नव्हतं, ते मित्रांसोबत बाहेर जायचे, ते काम करत नाही नाही, गुंडगिरीसारखे वागायचे. मला भीती वाटत असायची की माझे वडील घरी जिवंत परत येणार नाहीत.

या मुलाखतीदरम्यान, कॉमेडियनने बॉलीवूडमधील काही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांसोबत काम केल्याबद्दलही सांगितले. जॉनीला लिवर यांना विचारले की, शाहरुख खान इतका सुपरस्टार होणार हे माहीत होत का? यावर ते म्हणाले की, त्याने शाहरुखसारखा मेहनती माणूस पाहिला नाही. ते म्हणाले, 'बाजीगरमध्ये आम्ही 1991 मध्ये एकत्र काम केले होते. शूटिंगदरम्यानही लोक मला त्याच्यापेक्षा चांगले ओळखत होते. त्यावेळी मी स्टार होतो. त्यांच्यासारखा कष्टाळू, खूप कष्टाळू माणूस मी कधीच पाहिला नाही.

दरम्यान, जॉनी लिवर बाजीगर', 'राजा हिंदुस्तानी', 'दूल्हे राजा', 'बादशाह', 'आमदनी अट्ठानी खर्चा रुपय्या', 'खट्टा मीठा', 'गोलमाल', 'दे दना दन' अशा एकापेक्षा एक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये जॉनी लिवर यांचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"..समझो हो ही गया"! 2 देश, 2 कायदे...पण अखेर प्रेमच जिंकलं; गोव्याची तरुणी, पोर्तुगीज युवक अडकणार विवाहबंधनात

Goa Politics: खरी कुजबुज; युरीला मुख्यमंत्रिपदाचा आशीर्वाद!

Russian Murder Case: 3 दिवसांत 2 खून! रशियन सिरीयल किलर गोव्यात सतत बदलायचा जागा; पोलिसांनी आवळला तपासाचा फास

Arpora Nightclub Fire: ‘बर्च’ नाईटक्लब नियमबाह्यच! हडफडे पंचायतीला जाग; मिठागरावर बांधकाम उभारल्याचे मान्य

New BJP President: नितीन नबीन भाजपचे नवे 'सारथी'! अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT