John Abraham Dainik Gomantak
मनोरंजन

जॉन अब्राहमला तेव्हा तालिबानकडून मिळाल्या होत्या धमक्या

तब्बल 16 वर्षांनंतर ही घटना आली समोर

दैनिक गोमन्तक

अभिनेता जॉन अब्राहमने नुकताच धक्कादायक खुलासा केला आहे. अफगाणिस्तानात चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्याला आणि 'काबुल एक्सप्रेस'च्या टीमला तालिबानकडून धमक्या आल्याची घटना त्याने सांगीतली. 2006 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात दोन भारतीय, एक अमेरिकन पत्रकार आणि एक अफगाण मार्गदर्शक, ज्यांना पाकिस्तानी सैनिकांनी ओलिस ठेवले होते आणि त्यांना अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) 48 तासांचा प्रवास करण्यास भाग पाडले होते अशा दोन भारतीयांची काल्पनिक कथा दर्शविली होती. (John Abraham had received threats from the Taliban)

या थ्रिलर चित्रपटात जॉन अब्राहमने भारतीय पत्रकार सोहेल खानची भूमिका साकारली होती. नुकताच त्याने अफगाणिस्तानमधील शूटिंगबद्दलचा अनुभव शेअर केला. तेथील स्थानिक लोक खूप प्रिय असल्याचेही त्याने सांगितले आहे.

अभिनेत्याने (Bollywood Actor) एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मी अफगाणिस्तान सोडत होतो, तेव्हा सोशल मीडिया नव्हता. अफगाण लोकांनी मला सांगितले की जॉन तुला वाट्टेल ते कर, पण अफगाणिस्तानबद्दल काहीही वाईट बोलू नकोस. आज मला हे रेकॉर्डवर सांगायचे आहे की अफगाण लोक जगातील सर्वात सुंदर, लोक आहेत.

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नजीबुल्लाह यांच्या घरी 'काबुल एक्स्प्रेस'चे शूटिंग सुरू असताना त्यांच्या घरी थांबलेल्या प्रसंगाची आठवणही जॉनने केली आहे. तो पुढे म्हणाला, मी चहा घेण्यासाठी गच्चीवर गेलो आणि समोरून रॉकेट येऊन अमेरिकन दूतावासावर आदळले. त्यावेळी कोंडोलिझा राइस या अफगाणिस्तानसाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री होत्या. ते इथल्या रहिवासी अमेरिकनबाबत फारसे खूश नव्हते.

हे त्याला सांगण्याची अफगाणिस्तानची पद्धत होती. आम्ही तिथे पोहोचण्यापूर्वी 6 तास आधी एका आत्मघाती बॉम्बरने स्फोट घडवून आणल्याची दुसरी घटना घडली. तो एक अनुभव होता. वर्क फ्रंटवर जॉन अब्राहम लवकरच 'अटॅक' या चित्रपटात दिसणार आहे. यात जॅकलीन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग, प्रकाश राज आणि रत्ना पाठक शाह यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा जेए एंटरटेनमेंट आणि अजय कपूर प्रॉडक्शन हाऊसने संयुक्तपणे बनवला आहे. हा चित्रपट 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

SCROLL FOR NEXT