मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच ' झुंड ' (Jhund) चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर शेअर झाले आहे. अमिताभ बच्चन यांचे फोटो पाहून चाहते त्यांच्या शरीरयष्टीबद्दल आणि अमिताभ यांच्या फिटनेसबद्दल खूप चर्चा करताना दिसले. सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेले अमिताभ बच्चन यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोतही अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलला तोड नाही. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन फुल ऑन अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. 80 वर्षीय अमिताभ बच्चन यांना या गेटअपमध्ये पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले की बिग बी 80 वर्षांचे असूनही यंग दिसत आहेत. त्यांच्यात एक वेगळीच उर्जा दिसत आहे.
बिग बी वयाच्या 80 व्या वर्षी स्टंट करताना दिसले
अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्याच्या शक्तीचे प्रदर्शन दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी या पोस्टला '53 सालों के बाद भी 80 साल की उम्र में, कुछ चीजें कभी नहीं बदलतीं- एक्शन.’ असे कॅप्शन दिले. आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल (Football) प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या आतापर्यंत दोन पोस्ट्स समोर आल्या आहेत, ज्यामध्ये अमिताभ बच्चन ट्रॅकसूट घालून मुलांना प्रेरित करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या झुंड (Jhund) या टित्रपटाचा ट्रेलर एक दिवस आधी रिलीज झाला होता.
झुंड या मोस्ट अवेटेड चित्रपटात अमिताभ बच्चन एका स्पोर्ट्स कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत जे काही मुलांसोबत मिळून फूटबॉल टीम बनवतो. अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट सामाजिक कार्यकर्ते विजय बुरसे यांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक क्रीडा नाटक आहे. विजय झोपडपट्टी भागातील मुलांसाठी फुटबॉल संघ तयार करतो. या चित्रपटात बिग बींशिवाय आकाश तोषार, रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत आहेत. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दोघेही स्टार या चित्रपटात दिसणार आहेत. आणि सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळे यांनी झुंडचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज पोपटराव मुंजुळे पहिल्यांदाच सोबत काम करत आहेत. हा चित्रपट २ मार्चला प्रदर्शित होणार आहे. यासोबतच नागराज या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.