Jaya Prada dainik gomantak
मनोरंजन

Jaya Prada Birthday : वयाच्या 60 व्या वर्षीही सदाबहार आहे जया प्रदा

सौंदर्य आणि नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जया यांचा आज 60 वा वाढदिवस

दैनिक गोमन्तक

Happy Birthday Jaya Prada: जया प्रदा या बॉलीवूड मधील एक सुंदर अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या अभिनयाने हिंदी आणि तेलुगु चित्रपट क्षेत्रातील प्रभावशाली अभिनेत्री मानले जाते. 80-90 च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जया यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. जया या ६० वर्षांच्या झाल्या असल्या तरी आजही त्यांचे सौंदर्य अनेकांना भुरळ घालणारे आहे. (Jaya Prada Birthday Special Jaya Prada's age is not old even at the age of 60)

जया यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे या छोट्याशा गावात झाला. जया यांचे खरे नाव ललिता राणी रावणम असून त्यांचे वडील तेलुगू चित्रपट (Telugu movies) उद्योगाचे फायनान्सर होते, त्यामुळे त्यांचा चित्रपट उद्योगाशी वावर होता. तर जया या लहानपणापासून शास्त्रीय नृत्यात पारंगत होत्या. यांनी अगदी लहान वयातच चित्रपटांमध्ये पदार्पण केले. याचीही एक कहाणी आहे, जया या जेव्हा शाळेत शिकत होत्या, तेव्हा शाळेच्या फंक्शनमध्ये एका दिग्दर्शकाने तिची प्रतिभा पाहून चित्रपटात छोट्या भूमिकेची ऑफर दिली होती. या भूमिकेसाठी त्यांना त्यावेळी 10 रुपये मिळाले होते. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहीले नाही. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं होतं. त्यानंतर त्या बॉलिवूडकडे वळल्या, त्यानंतर बॉलीवूडमध्येही त्यांना यश मिळवले. त्यांनी इंडस्ट्रीला एकापेक्षा एक असे सरस चित्रपट दिले आहेत.

जया यांनी 1979 साली आलेल्या सरगम ​​या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांचा नायक होता ऋषी कपूर. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील गाणी आजही अनेकांच्या मनात आहेत. तर प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांनी जया यांच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही कौतुक केले होते. त्यांनी जयाप्रदा यांना जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानले होते. जया बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीत आल्या तेव्हा रेखा, हेमा मालिनी, श्रीदेवी, पूनम धिल्लन, पद्मिनी कोल्हापुरे अशा नायिकांचं राज्य होतं. पण तरीही जया यांनी स्वतःचा ठसा उमटवला. जया यांनी आपल्या काळातील प्रत्येक सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर केली. त्यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र, राजेश खन्ना, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल, ऋषी कपूर यांसारख्या सुपरस्टार्ससोबत (Superstars) काम केले.

यशाच्या शिखरावर असणाऱ्या जया यांच्याबाबतूत मात्र त्यांचे प्रेमच दुःख देणारे ठरले आहे. जया यांनी एका दिग्दर्शकाशी (Director) विवाह केला जो विवाहित आणि तीन मुलांचा बाप होता. आणि याच कारणामुळे त्यांना पत्नीचा दर्जा कधीच मिळू शकला नाही. लग्नानंतर त्या काही काळ पतीसोबत राहिल्या. मात्र त्यानंतर त्या पतीला सोडून एकट्या राहू लागल्या.

जया यांनी शराबी, सरगम, घर घर की कहानी, मोक्ष, संजोग, स्वर्ग से सुंदर, तोहफा, औलाद, सिंदूर, ठाणेदार, मवाली, मैं तेरा दुश्मन, मुद्दत, कामचोर, वीरता या चित्रपटांमध्ये काम केले. सध्या त्या चित्रपटांपासून दूर असून मध्यंतरी त्या टीव्ही सीरियल ससुराल सिमर का २ मध्ये कॅमिओ करताना दिसल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT