FILMFARE च्या डिजिटल मुखपृष्ठावर झळकणारी पहिली मराठमोळी अभिनेत्री 'Amruta Khanvilkar'

‘चंद्रमुखी’ या चित्रपटामुळे सध्या सोशल मिडियावर अमृता खानविलकर चर्चेत आहे.
Amruta Khanvilkar
Amruta KhanvilkarInstagram
Published on
Updated on

बॉलीवुड चित्रपटांसह मराठी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या ती विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात नृत्यांगणेची मुख्य भूमिका ती साकारत असून दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरचे या चित्रपटासाठी विशेष कौतुक केले जात आहे. तसेच ती आणखी एका गोष्टीमुळं सोशल मिडियावर (Social Media) चर्चेत आली आहे.

प्रसाद ओक हे 'चंद्रमुखी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याने अमृतांचा आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर फोटो (Photo) शेअर करत तिच्या चाहत्यांसह खास गोष्ट शेअर केली आहे.कारण ही गोष्ट अभिवं वाटावी अशीच आहे. प्रसाद ओकने पोस्ट केलेया फोटोखाली लिहिले कि, "अभिमान* *प्रेम* *अभिनंदन* FILMFARE च्या डिजिटल मुखपृष्ठावर झळकणारी पहिली अभिनेत्री तू ठरली आहेस अमृतायाचा प्रचंड *अभिमान* वाटतोय.

Amruta Khanvilkar
अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला एक्स्प्रेस वेवर अपघात

प्रसाद ओकने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रसाद ओकच्या या पोस्टवर कमेंट करत अमृताने प्रसादचे आभार मानले आहे. तसेच मंजिरी ओक, आदिनाथ कोठारे यांनी देखील अमृताचं अभिनंदन केलं आहे. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले असून पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटामध्ये दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील गाण्याला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com