Tamil Cinema Jai Bhim  Dainik Gomantak
मनोरंजन

सूर्याचा ‘जय भीम’ थेट ऑस्करच्या शर्यतीत !

संपुर्ण भारतभर चर्चेत आलेल्या टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित ‘जय भीम’ (Jay Bhim) चित्रपटाने विदेशातही आपला डंका वाजवला आहे.

दैनिक गोमन्तक

नुकताच प्रदर्शित झालेला साऊथचा सुपरस्टार सुर्याचा 'जय भीम' (Jay Bhim) चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. चित्रपटाने सर्वांची मने जिंकली. चित्रपटाची दमदार कथा आणि सुर्याच्या जबरदस्त अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाने आपल्या नावावर एक विक्रम नोंदवला आहे, त्यामुळे आता निर्माते आणि सुर्याचे चाहते खूश आहेत.

सुर्याचा हा (Jai Bhim) चित्रपट ऑस्करच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर दाखवण्यात आला आहे. यासह, ऑस्करच्या यूट्यूबवर प्रदर्शित झालेला हा भारतातील पहिलाच चित्रपट ठरला आहे. आता ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी 'जय भीम'बाबत सोशल मीडियावर अनेक कमेंट करायला सुरुवात केली आहे. जय भीम चित्रपट ऑस्कर 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे.

याआधीही सुर्याच्या या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. याला IMBD वर 9.6 रेटिंग मिळाले, ज्याने बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या अनेक उच्च रेटिंग चित्रपटांनाही मागे टाकले. याशिवाय, सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपटाच्या श्रेणीमध्ये गोल्डन ग्लोब 2022 मध्ये देखील जय भीमला नामांकन मिळाले आहे.

टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित या चित्रपटात सुर्या एका वकिलाच्या भूमिकेत दिसला. याशिवाय राजिषा विजयन आणि प्रकाश राज यांसारखे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचे सिनेरसिकांनी खूप कौतुक केले.

मरक्कर चित्रपटही ऑस्करच्या रांगेत

प्रियदर्शन दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनित ‘मरक्कर’ या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटाचाही ऑस्कर पुरस्काराच्या यादीत समावेश झाला आहे. खुल्या विभागात निवड झालेल्या 276 चित्रपटांची यादी ऑस्करच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली. ज्यात या दोन्ही चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांची संपुर्ण आणि अंतिम यादी 8 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT