Jawan Vs Gadar 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan Vs Gadar 2 : 'जवान'समोर तारासिंह भुईसपाट...24 व्या दिवशीही शाहरुख खानची क्रेझ कायम

अभिनेता शाहरुख खानच्या जवानच्या क्रेझसमोर सनी देओलच्या गदर 2 ची पिछेहाट झाली आहे.

Rahul sadolikar

2023 चा सगळ्यात हीट चित्रपट कोणता? असा जर कुणी प्रश्न विचारला तर कुणीही उत्तर देईल 'जवान' साहजिकच चित्रपटाने गेल्या 23 दिवसांत मिळवलेल्या यशाने चाहत्यांसह सेलिब्रिटींच्याही भुवया उंचावल्या आहेत.

7 सप्टेंबरला रिलीज झालेल्या जवानने गदरलाही मागे टाकले आहे. कमाईच्या बाबतीत जवान आजवरचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

जवान...

शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण आणि सान्या मल्होत्रा ​यांच्या प्रमुख भूमीका असणारा 'जवान' 24 व्या दिवशीही त्याच जोरदारपणे चालला आहे.

चौथ्या शनिवारी त्याने शुक्रवारी केलेल्या कमाईपेक्षा दुप्पट कमाई केली. हा आकडा पाहता चौथ्या रविवारीही आणखी चांगली कामगिरी करू शकेल, असा अंदाज तुम्ही लावू शकता.

हिंदी, तेलगू आणि तमिळमधली कमाई

sacnilk च्या अहवालानुसार, Atlee दिग्दर्शित जवान ने 24 व्या दिवशी 9.25 कोटी रुपये कमवले. तर 23 व्या दिवशी हा आकडा 5.5 कोटी रुपये होता. 

या कमाईसह जवानचे हिंदी, तामिळ आणि तेलुगूमध्ये नेट कलेक्शन 596.20 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

'जवान'समोर सगळे भुईसपाट...

 याआधीही शाहरुख खानची जादू देशातच नाही तर जगभरात पाहायला मिळाली आहे . अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्येही या अभिनेत्याचे फॅन फॉलोइंग खूप आहे.  यामुळेच शाहरुख खानचे चित्रपट परदेशातही चांगला व्यवसाय करतात. 

'फुकरे 3' आणि 'द वॅक्सीन वॉर' सारखे नवीन चित्रपट आले असूनही, 'जवान'च्या जगभरातील कलेक्शनने या 24 दिवसांत 1055 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

गदर 2 विषयी

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर 2' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, या चित्रपटाने देखील थिएटरमध्ये 51 दिवस पूर्ण केले आहेत. पण आता त्याची सॅक बेडिंग पॅक झालेली दिसते.

 या 60 दिवसांत 'गदर 2' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 524.85 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. अनिल शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'गदर 2'ने बजेटपेक्षा 600 टक्के अधिक व्यवसाय केला आहे.

 गदर 2 ने कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाला मागे टाकले होते . आता 'गदर 2'चा हा रेकॉर्ड मोडून 'जवान' हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT