Javed Akhtar Statement On Pathan Controversy  Dainik Gomantak
मनोरंजन

Javed Akhtar Statement On Pathan : 'आपल्याकडे 4-5 महत्वाचे धर्म आणि ...' पठाण वादावर जावेद अख्तर यांचे मोठे वक्तव्य

Pathaan: पठाण चित्रपटातील बेशरम गाणे प्रसिद्ध झाल्यावर संपूर्ण देशात कपड्यांच्या रंगावरुन वाद सुरु होता.

दैनिक गोमन्तक

Pathaan: जावेद अख्तर बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर ते आपल्या परखड वक्तव्यासाठीदेखील प्रसिद्ध आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून ते नेहमीच आपले मत मांडत असतात. आता त्यांनी पठाण वादावर देखील आपले मत मांडले आहे.

पठाण चित्रपटातील बेशरम गाणे प्रसिद्ध झाल्यावर संपूर्ण देशात कपड्यांच्या रंगावरुन वाद सुरु होता. दरम्यान, मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. त्याचबरोबर, कपड्यांचा रंगाबाबत चित्रपटात बदल करावेत अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या होत्या. जावेद अख्तर यांनी यावर जोरदार टीका केली आहे.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना चित्रपटाबाबत एवढीच समस्या असेल तर त्यांनी मध्य प्रदेश( Madhya Pradesh ) सरकारचा स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची स्थापना करावी आणि मग ठरवावे कोणता चित्रपट बघावा आणि कोणता चित्रपट बघू नये. जर ते केंद्राच्या सेन्सॉर बोर्डाच्या सर्टिफिकेशने खूष नसतील तर तो त्यांचा आणि केंद्र सरकारमधला प्रश्न आहे . आपण यांच्यामध्ये काही बोलले नाही पाहिजे असे जावेद इख्तर यांनी म्हटले आहे.

अलीकडेच स्थापन झालेल्या धर्म सेन्सॉर बोर्डाबद्दल त्यांनी यामध्ये काही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. आपल्याकडे 4-5 महत्वाचे धर्म आहेत आणि त्या प्रत्येक धर्माचे सेन्सॉर बोर्ड असायला हवेत. तेव्हाच मौलवी चित्रपट पाहायला सुरुवात करतील अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

तुम्ही आणि मी गाणे चुक किंवा बरोबर ठरवणारे कोण आहोत. लोकांनी सेन्सॉर बोर्डावर विश्वास ठेवायला पाहिजे. अशी प्रतिक्रिया पठाणच्या गाण्यातील वादावर जावेद अख्तर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT