Vrun Dhawan-Janhvi Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Vrun Dhawan-Janhvi Kapoor's Bawaal: जान्हवी कपूर अन् वरुण धवन करणार ओटीटीवर 'बवाल'

Bawaal: जरा हटके जरा बचके' या कमी बजेट असलेल्या चित्रपटाने चांगली कमाई केल्याने महत्वपूर्ण मानला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bawaal: जानव्ही कपूर आणि वरुन धवन यांचा आगामी चित्रपट बवाल हा चर्चेचा विषय बनला आहे. लॉकडाऊननंतर बॉलीवूड चित्रपटांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे बॉलिवूडमधील कलाकारांसमोर चित्रपट न चालण्याचे नेमके काय कारण आहे हा प्रश्न निर्माण झाला होता.

किंग खानचा 'पठाण' बॉक्स ऑफीसवर ब्लॉकबस्टर ठरला. 'तू झूठी मै मक्कार' आणि आत्ताच रिलिज झालेली जरा हटके जरा बचके या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती.

विशेषत: 'जरा हटके जरा बचके' या कमी बजेट असलेल्या चित्रपटाने चांगली कमाई केल्याने महत्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे आता चित्रपटगृहात बॉलीवूड कंटेट असलेले चित्रपट चालणार अशी आशा वाटत असतानाच जानव्ही कपूर आणि वरुन धवनचा बवाल हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आल्यानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बवाल हा चित्रपट नितेश तिवारी दिग्दर्शित केला आहे. नितेश तिवारी हे बॉलीवूडमधील एक यशस्वी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून नावारुपाला आले आहेत. त्यांनी आतापर्यत भारतीय सिनेमागृहात सगळ्यात जास्त कमाई करणारा दंगल या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटाने जगभरात 2000 करोड रुपयांची कमाई केली होती. सुशांत सिंग राजपूत चा गाजलेला छिछोरे या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील नितेश तिवारींनी केले आहे. त्यांच्याकडून बॉलीवूडला मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे त्यांचा चित्रपट अॅमॅझॉन प्राइमला विकल्याने इंडस्ट्रीमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चित्रपटगृहात रिलिज करण्याऐवजी ओटीटीवर का रिलिज केला जात आहे असा प्रश्न विचारला जात आहे.

हे आहे कारण

अलीकडे ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये स्पर्धा वाढलेली दिसून येत आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, अॅमॅझॉन प्राइमने या चित्रपटासाठी 200 करोड रुपए दिले आहेत. दरम्यान, आता बवाल हा चित्रपट जुलैमध्ये एकाचवेळी 200 देशात स्ट्रीम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT