'Avatar The Way Of Water' Dainik Gomantak
मनोरंजन

'Avatar The Way Of Water' रिलीज होण्यापूर्वी भारतात डंका,अॅडव्हान्स बुकिंगला उदंड प्रतिसाद

Avatar The Way Of Water: जेम्स कॅमेरॉन यांच्या आगामी अवतार: द वे ऑफ वॉटर या चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार: द वे ऑफ वॉटर (Avatar The Way Of Water) या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2009 मध्ये रिलीज झालेल्या 'अवतार'चा सिक्वेल आहे, ज्याची क्रेझ अजूनही लोकांच्या डोक्यात आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता 'अवतार: द वे ऑफ वॉटर' रिलीज होण्यापूर्वी भारतात (India) त्याच्या तिकिटांची आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे.

एका अहवालानुसार केवळ तीन दिवसांत 'अवतार: द वे ऑफ वॉटर'च्या 15 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. ही आगाऊ बुकिंग केवळ 45 स्क्रीन्सवर प्रीमियम स्वरूपात होती. अॅडव्हान्स बुकिंगसाठी मिळत असलेला प्रतिसाद पाहता आणखी काही स्क्रीन वाढवण्यात येत आहेत.

  • हा चित्रपट अनेक भाषांमध्ये होणार रिलीज

'अवतार: द वे ऑफ वॉटर' हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये देशभरात रिलीज होणार आहे. काही काळापूर्वी, जेम्स कॅमेरूनने 'अवतार' चित्रपटगृहांमध्ये पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून चाहत्यांना पुन्हा एकदा पॅंडोराच्या दुनियेची ओळख व्हावी. यावेळी चित्रपटात मानव आणि पांडोरा येथील रहिवासी यांच्यात पाण्याखालील लढाई होणार आहे, हे ट्रेलरमधून स्पष्ट झाले आहे.

जेम्स कॅमेरून हे महागडे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. रिपोर्ट्सनुसार, 'अवतार: द वे ऑफ वॉटर' 250 दशलक्ष डॉलर्समध्ये तयार करण्यात आला आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT