Avatar 2 Box Office Collection | Avatar 2 Release | Avatar 2 Collection  Dainik Gomantak
मनोरंजन

Avatar 2 Box Office Collection: 'अवतार 2' चा बॉक्स ऑफिसवर धमाका, पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कलेक्शन

पहिल्याच दिवशी 'अवतार द वे ऑफ वॉटर'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

Avatar 2: अखेर तो क्षण आला, ज्याची सर्व प्रेक्षक गेल्या 13 वर्षांपासून वाट पाहत होते. हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा प्रसिद्ध चित्रपट 'अवतार द वे ऑफ वॉटर' म्हणजेच अवतार 2 चित्रपटगृहात दाखल झाला आहे. अवतार 2 ने बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाकेदार एंट्री करून धमाकेदार कमाई केली आहे. या हॉलिवूड चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी किती कोटींची कमाई केली हे जाणून घेऊया.

जेम्स कॅमेरून दिग्दर्शित 'अवतार द वे ऑफ वॉटर' ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. शुक्रवारी 16 डिसेंबर रोजी रिलीज झाल्याने या चित्रपटाने प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवली आहे. 'अवतार द वे ऑफ वॉटर' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात करेल, अशी अपेक्षा होती आणि तसेच झाले.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार अवतार पार्ट 2 ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 40 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या शानदार सुरुवातीने 'अवतार द वे ऑफ वॉटर'ने हे सिद्ध केले आहे. आगामी काळात 'अवतार 2' कमाईच्या बाबतीत विक्रम करेल.

  • अवतार 2' ने या हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले

पहिल्याच दिवशी मोठी कमाई करणाऱ्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' ने पहिल्याच दिवशी कलेक्शनच्या बाबतीत अनेक हॉलिवूड (Hollywood) चित्रपटांना मागे टाकले आहे. 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'अवतार 2' ने मार्वल युनिव्हर्सचा सुपरहिट चित्रपट 'स्पायडर-मॅन - नो वे होम' 32 कोटी आणि 'Avengers Infinity War' ने 31 कोटींचा ओपनिंग डे बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT