James Bond Dainik Gomantak
मनोरंजन

जेम्स बाँडचा 'नो टाईम टू डाय' OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

दैनिक गोमन्तक

जेम्स बाँडचा 'नो टाइम टू डाय' आता थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 4 मार्च रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. जेम्स बाँडचे (James Bond) इतर सर्व चित्रपट प्राइम व्हिडिओवर आधीच उपलब्ध आहे. इंग्रजी व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जात आहे. (James Bonds No Time To Die Will Be Released On OTT Platform)

नो टाइम टू डायमध्ये जेम्स बाँडचे रिटायरमेंटचे आयुष्य जमैकामध्ये (jamaica) जगताना दाखवले आहे, परंतु अपहरण झालेल्या शास्त्रज्ञाच्या सुटकेसाठी त्याला शेवटच्या मोहिमेवर बोलावले आहे. या मिशनमध्ये बाँडचा सामना खतरनाक खलनायक लुसिफर सॅफिनशी (Lucifer Safin) होतो. हे पात्र रामी मलेकने साकारले आहे.

दरम्यान, नो टाइम टू डाय हा जेम्स बाँड सीरीजमधील 25 वा आणि डॅनियल क्रेगचा पाचवा आणि शेवटचा चित्रपट आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केले होते. या सीरीजमधील डॅनियलची एंट्री 2006 मध्ये आलेल्या Casino Royale या चित्रपटातून झाली. तेव्हापासून डॅनियल जेम्स बाँड बनत आहे. डॅनियल बाँड 2008 मध्ये क्वांटम ऑफ सोलेस, 2012 मध्ये स्कायफॉल आणि 2015 मध्ये स्पेक्ट्रामध्ये दिसले. नो टाईम टू डायची कथा स्पेक्ट्रच्या अनेक वर्षांनी सेट झाली आहे. या मिशननंतर बाँड त्याच्या सेवा समाप्त करतो.

तसेच, नो टाईम हा चित्रपट 2020 च्या एप्रिल महिन्यात पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता, परंतु मार्चमध्ये कोरोना महामारीने जगाला वेढले, त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. तथापि, कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) प्रभावामुळे ते पुन्हा एप्रिल 2021 वर ढकलले गेले. 2021 मध्ये महामारीची दुसरी लाट सुरु झाली आणि शेवटी हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT