Rajnikant  Dainik Gomantak
मनोरंजन

Jailer Trailer: जेलरचा ट्रेलर पाहून चाहते म्हणाले 'हा तर आमचा...'

Jailer Trailer: जेलर हा चित्रपट 10 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Jailer Trailer: साऊथचा सुपरस्टार रजनीकांत नेहमीच आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. आपल्या अभिनयाने तो प्रेक्षकांचे कायम मनोरंजन करत आला आहे. आता त्यांच्या आगामी चित्रपटामुळे ते सध्या मोठ्या चर्चेत आहेत. नुकताच जेलर या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला असून त्यातील काही सीनची प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहेत.

'जेलर'च्या ट्रेलरची वेगवान अॅक्शन सीनने सुरुवात होते. रजनीकांतच्या म्हणजेच जेलरच्या तुरुंगात एका टोळीचा म्होरक्या कैद आहे. हा म्होरक्याला जेलरच्या तुरुंगातून सोडवण्यासाठी त्या टोळीतील माणसे सुटका करण्यासाठी योजना आखतात.

जेलर मुथुवेल म्हणजेच रजनीकांत अतिशय कडक, पण प्रामाणिकही पोलिस असल्याचे दिसून येत आहे. मात्र या जेलरचे दुसरे एक रुप आहे ज्यामुळे प्रेक्षकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका सीनमध्ये ज्यामध्ये शरीफचा मुथुवेल म्हणजेच रजनीकांत अत्यंत उग्र अवतारात दिसत आहे. महत्वाचे म्हणजे हे त्यांचे रुप इतर जगाला आणि कुटुंबियाला माहीत नाही.

दरम्यान, जेलर हा चित्रपट 10 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. जेलर'मध्ये रजनीकांत पोलिसाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात तमन्ना भाटिया आणि बाहुबलीची शिवगामी म्हणजेच रम्या कृष्णन महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.

चित्रपटाचे नाव आधी थलायवर 169 असे होते, परंतु निर्मात्यांनी नंतर ते जेलर असे बदलले. आता हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या निर्मात्यांनी हा चित्रपट तमिळमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेलर( Trailer ) पाहून चाहत्यांनी आमचा थलाइवा परत आल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT