Jailer towards 650 Crore  Dainik Gomantak
मनोरंजन

Jailer Collection : जेलर काही थांबेना... आता मारली 650 कोटींची मजल

Rahul sadolikar

Jailer earn's 650 Crore on Box Office Collection : अभिनेते रजनीकांतचा जेलर बॉक्स ऑफिसवर त्याच वेगात धावत आहे. चित्रपटाने सुरूवातीला 300 कोटींचा आकडा पार केल्यावर रजनीकांत यांनी जल्लोष साजरा केला होता. आता या चित्रपटात कमाईचा वेग कायम राखत 650 कोटींची कमाई केली आहे.

रजनीकांत यांचा जलवा

रजनीकांतचा अॅक्शन चित्रपट जेलरने आतापर्यंत जगभरात ₹ 640 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि लवकरच ₹ 650 कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांच्या ट्विटनुसार , रिलीजच्या 26 दिवसांत, थिएटरमध्ये चौथ्या सोमवारी ₹2.39 कोटी कमावल्यानंतर , जेलरने जागतिक स्तरावर ₹ 640.18 कोटींची कमाई केली आहे. जेलरला 10 ऑगस्ट रोजी जगभर सोडण्यात आले.

मनोबाला विजयबालन यांचे ट्विट

मंगळवारी, मनोबाला विजयबालन यांनी ट्विटर किंवा X वर जेलरच्या जगभरातील बॉक्स ऑफिसमधील ब्रेकअप शेअर केले. 

पहिल्या आठवड्यात , जेलरने जगभरात ₹ 450.8 कोटींची कमाई केली; 2 आठवड्यामध्ये, चित्रपटाने त्याच्या जगभरातील कमाईमध्ये आणखी ₹ 124.18 कोटी जोडले.

जेलरची कमाई

मनोबाला यांनी ट्विट केले, “ जेलर जगभरातील बॉक्स ऑफिसवर. ₹ 650 कोटी धुवाधार कमाई करत आहे . पहिला आठवडा - ₹ 450.80 कोटी. दुसरा आठवडा - ₹ 124.18 कोटी. 3वा आठवडा - ₹ 47.05 कोटी. आठवडा 4, दिवस 1 - ₹ 3.92 कोटी.

दिवस 2 रा - ₹ 3.11 कोटी. दिवस 3 - ₹ 4.17 कोटी. चौथा दिवस - ₹ 4.56 कोटी. दिवस 5 - ₹ 2.39 कोटी. एकूण - ₹ 640.18 कोटी.

600 कोटींची कमाई करणारा दुसरा चित्रपट

ऑगस्ट महिन्यात , 2.0 (2018) आणि Ponniyin Selvan: I (2022) नंतर ₹ 500 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा Jailer हा तिसरा तमिळ चित्रपट ठरला . आता त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची भर पडणार आहे. 18 दिवस थिएटरमध्ये यशस्वीरित्या चालल्यानंतर, जगभरातील एकूण कमाईचा  600 कोटींचा टप्पा पार केला . 

या प्रक्रियेत, चित्रपटाने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीकांत आणि अक्षय कुमार-स्टारर 2.0 नंतरचा दुसरा सर्वात जलद 600 कोटी कमाई करणारा तमिळ चित्रपट बनून विक्रमही रचला आहे.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT