G- Marimuthu  Dainik Gomantak
मनोरंजन

G- Marimuthu : 'जेलर' फेम साऊथच्या या ज्येष्ठ अभिनेत्याचा मृत्यू...साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का

साऊथचे ज्येष्ठ अभिनेते जी मारिमुथू यांचं निधन झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.

Rahul sadolikar

Jailer fame actor G marimuthu Passes Away : गेल्या काही दिवसांपासुन साऊथ इंडस्ट्रीसह बॉलीवूडवरही गारुड घालणाऱ्या रजनीकांत यांच्या थलैवा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती.

एकीकडे चित्रपट कमाईचे नवनवे उच्चांक गाठत असताना चित्रपटात महत्त्वाची भूमीका साकारणाऱ्या एका ज्येष्ठ कलाकाराचे निधन झाले आहे.

नुकत्याच समोर आलेल्या या वृत्ताने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

जेलरमध्ये केलं होतं काम

जेलर फेम अभिनेते जी मारिमुथु यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनयासह दिग्दर्शक म्हणूनही ओळखल जाणारे मारिमुथू नुकत्याच हिट ठरलेल्या  रजनीकांत अभिनीत ब्लॉकबस्टर जेलरमध्ये दिसला होता. 

चित्रपट व्यापार विश्लेषक आणि इंडस्ट्री इनसाइडर रमेश बाला यांनी शुक्रवारी(8 सप्टेंबर) X म्हणजेच ट्विट्टरवर या बातमीची पुष्टी केली,

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम

जी मारिमुथू 57 वर्षांचे होते. ते तामिळ टेलिव्हिजन मालिका इथरनीचलमधील भूमिकेसाठी ओळखले जात होते. त्यांनी चित्रपट निर्माते मणिरत्नम यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. 

रमेश बाला

रमेश बाला यांनी ट्विट केले, "धक्कादायक: लोकप्रिय तमिळ पात्र अभिनेते मारिमुथू यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले...

अलीकडेच, त्यांच्या टीव्ही मालिकेतील संवादांसाठी त्यांचा मोठा चाहतावर्ग वाढला आहे... त्यांच्या आत्म्याला शांती लाभो!" दुसर्‍या ट्विटमध्ये बाला पुढे म्हणाले, “तो 57 वर्षांचा होता...”

डबींग करत असताना कोसळले

मिळालेल्या माहितीनुसार जी मारीमुथू शुक्रवारी (8 सप्टेंबर) सकाळी 8.30 च्या सुमारास चेन्नईमध्ये त्याच्या टीव्ही मालिका इथरनीचलचे डबिंग करत असताना कोसळले. 

साऊथ इंडस्ट्रीत काम करणाऱ्या जनसंपर्क व्यावसायिक जॉन्सनने केलेल्या ट्विटनुसार मारिमुथू यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अभिनेत्रीचे ट्वीट

अभिनेत्री रडिका सरथकुमार यांनी ट्विट केले, "मरीमुथूचे निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले आणि धक्का बसला आहे, त्यांच्यासोबत काम करताना चांगला अनुभव आला, ते खूप लवकर गेले आहे. त्यांच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करते."

चाहत्याचे ट्विट

एका चाहत्याने ट्विट केले की, "अष्टपैलू अभिनेते मारीमुथू यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. त्याचा अलीकडचा ब्लॉकबस्टर चित्रपट जेलर होता . ते मोठ्या आणि छोट्या पडद्यावरचे सुपरस्टार होते. आमच्या इंडस्ट्रीसाठी एक प्रचंड नुकसान आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. ."

चित्रपट दिग्दर्शकाचे बनण्याचे स्वप्न

वन इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार , चित्रपट दिग्दर्शन आणि टीव्ही शोमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते .

 1990 मध्ये जी मारिमुथू यांनी त्यांचे मूळ गाव थेनी येथील पासुमलाईथेरी सोडले आणि चित्रपट दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चेन्नईला गेले.

मारिुमुथू यांचं करिअर

सुरुवातीला, त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले, परंतु लवकरच त्याने गीतकार वैरामुथू आणि राजकिरण सोबत अरनमनाई किली (1993) आणि एलाम एन रासाथन (1995) सारख्या चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टरची म्हणून काम केले .

पोर्टल मणिरत्नम, वसंत, सीमा आणि एसजे सूर्या यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांसोबत सहयोग करत, मरीमुथूने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू ठेवली. त्यांनी सिलांबरसन यांच्या मनमाधनमध्ये सहदिग्दर्शक म्हणूनही काम केले.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT