Jacqueline Fernandez & Sukesh Chandrasekhar Dainik Gomantak
मनोरंजन

Jacqueline Fernandez ला सुकेश चंद्रशेखरशी करायचे होते लग्न, 'स्वप्नातील राजकुमार...'

Sukesh Chandrasekhar: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

Jacqueline Fernandez & Sukesh Chandrasekhar: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी जॅकलिन फर्नांडिस सध्या चर्चेत आहे. बुधवारी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) जॅकलिनची आठ तास चौकशी केली. गेल्या महिन्यात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

दरम्यान, ईडीच्या (ED) आरोपपत्रात म्हटले आहे की, जॅकलीनवर सुकेशचा एवढा प्रभाव होता की, त्याचे गुन्हे उघडकीस आल्यानंतरही ती त्याच्या संपर्कात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिनला सुकेशसोबत लग्न करायचे होते. विशेष म्हणजे, तिला तो तिच्या स्वप्नांतील राजकुमार वाटायचा.

'जाणूनही जॅकलिनने नातं संपवले नाही'

आर्थिक गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुकेशच्या गुन्ह्यांची माहिती असतानाही तिने त्याच्याशी संबंध ठेवले. मात्र नोरा फतेहीला संशय येताच तिने स्वतःला त्याच्यापासून वेगळे केले.

दुसरीकडे, EOW चे विशेष पोलीस आयुक्त रविंदर यादव यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, "जॅकलिन फर्नांडिससाठी (Jacqueline Fernandez) अधिक त्रासदायक हे ठरले की, तिने सुकेशसोबतचे संबंध त्याच्या गुन्ह्यांबद्दल जाणून घेतल्यानंतरही संपवले नाहीत, परंतु नोराला काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्यानंतर ती लगेच त्याच्यापासून दूर झाली.''

मॅनेजरला बाईकही भेट दिली

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिनचा व्यवस्थापक प्रशांत याच्याकडून सुमारे 8 लाख रुपयांची सुपरबाईक जप्त केली आहे. EOW अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, सुकेश चंद्रशेखरने ही दुचाकी प्रशांतला भेट दिली होती.

पिंकी इराणी यांच्यामार्फत संपर्क झाला

नोरा फतेही सुकेश चंद्रशेखरला कधीच प्रत्यक्ष भेटली नाही, परंतु दोनदा त्याच्याबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर बोलली होती. ईओडब्ल्यूने नोराचा मेहुणा मेहबूब उर्फ ​​बॉबी खान आणि पिंकी इराणी यांची चौकशी केली. सुकेश चंद्रशेखरच्या सूचनेनुसार इराणीनेच नोराला महागड्या भेटवस्तू देऊन संपर्क साधला होता, असे अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT