Jacqueline Fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

Jacqueline Fernandez: 'जॅकलीनला सगळं माहित होतं; पण ती मुद्दाम...' ईडीचा मोठा दावा

Jacqueline Fernandez: आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नाडीस गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईमुळे चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

Jacqueline Fernandez: बॉलीवूडचे अभिनेते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नाडीस गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईमुळे चर्चेत आहे.

२०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने सुकेश चंद्रशेखर याच्या गुन्ह्यातील रक्कम तिने स्वीकारली होती आणि त्याचा वापर करण्यात ती सहभागी होती, असा युक्तिवाद अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली उच्च न्यायालयासमोर केला आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या याचिकेला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ईडीने हा युक्तिवाद केला आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीने तिच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

हा खटला न्यायाधीश मनोज कुमार ओहरी यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. जॅकलिनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने ईडीच्या प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी ठेवली आहे. जॅकलिनने चंद्रशेखरसोबतच्या आर्थिक व्यवहाराबाबत सत्य कधीच उघड केले नाही आणि पुरावे मिळेपर्यंत तथ्य लपवून ठेवल्याचा दावा ईडीने आपल्या उत्तरात केला आहे. जॅकलीन अक्षय कुमारच्या 'सेल्फी' चित्रपटात दिसली होती. सध्या ती 'फतेह' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT