Javed Akhtar Dainik Gomantak
मनोरंजन

Javed Akhtar: 'अ‍ॅनिमल' सारखे चित्रपट पुन्हा निर्माण होऊ नये ही प्रेक्षकांची जबाबदारी, चित्रपटावर नाराज जावेद अख्तर

Javed Akhtar: त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई होणे धोकादायक असल्याचे वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

Javed Akhtar: 'अ‍ॅनिमल' चित्रपट हा अॅक्शन-ड्रामा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला होता. रणबीर, अनिल, बॉबी, रश्मिका आणि तृप्ती डिमरी या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्याचे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाने अंदाजे 896.61 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अॅनिमल चित्रपटाचे जितके कौतुक झाले तितकीच या चित्रपटावर टीकादेखील झाली. आता जावेद अख्तर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी अॅनिमलसारखे चित्रपट निर्माण होणे, त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई होणे धोकादायक असल्याचे वक्तव्य केले आहे. याबरोबरच, त्यांनी अशा चित्रपटांवर बंदी घालण्याची ताकद फक्त प्रेक्षकवर्गाकडे असल्याचेदेखील म्हटले आहे.

ज्या चित्रपटात महिलेला अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली गेल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे, त्या चित्रपटाची इतकी कमाई होणे, बॉक्स ऑफीसवर तो चित्रपट हिट ठरणे धोकादायक असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

एकीकडे अॅनिमलची टीम सक्सेस पार्टी करत असताना जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्याची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT