Ira Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Ira Khan: आइरा खानसाठी किरण रावने गायले गाणे; नेटकरी म्हणाले...

Ira Khan: त्यांच्या लग्नाची धामधुम सुरु असून त्यांच्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले जात आहेत.

दैनिक गोमन्तक

Ira Khan: गेल्या काही दिवसांपासून आमिर खानची लेक आइरा खान चर्चेत आहे. ३ जानेवारीला आइरा खान आणि नुपुर शिखरे यांनी रजिस्टर लग्न केले आहे. आता १० जानेवारीला त्यांचा शाही लग्नसमारंभ पार पडणार आहे. त्यांच्या लग्नाची धामधुम सुरु असून त्यांच्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले जात आहेत.

आता आइरा खानच्या एका कार्यक्रमात तिची सावत्र आई किरण रावने तिच्यासाठी खास गाणे म्हटले आहे. या गाण्याची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये नुपूर शिखरे आणि इरा खानचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन पाहिले जाऊ शकते. व्हिडिओमध्ये आमिर खानची माजी पत्नी किरण राव एक सुंदर गाणे गाताना दिसत आहे, तर त्याचा मुलगा आझाद कोणतेतरी वाद्य वाजवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, किरण काळ्या रंगाची साडी परिधान केलेली सुंदर दिसत होती असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे किरण रावने गायलेल्या गाण्यावर आइरा आणि नुपूर खानने डान्सदेखील केला आहे. ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहे. आता उद्या १० जानेवारीला आइरा नुपूरच्या शाही लग्नाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विरोधी पक्षांचे नेते 'नर्व्हस' की 'ओवरकॉन्फिडेंट'? स्वार्थासाठी युती तोडली, भाजपला आयती संधी!

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

SCROLL FOR NEXT