Ira Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Ira Khan: रिसेप्शनला किरण रावने का मारली दांडी? समोर आले 'हे' कारण

Ira Khan: संपूर्ण खान कुटुंबाचा स्टेजवर एकत्र फॅमिली फोटो क्लिक केला होता, मात्र या फोटोमध्ये आमिरची पत्नी किरण राव दिसत नव्हती.

दैनिक गोमन्तक

Ira Khan: गेल्या काही दिवसांपासून आइरा खानच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. आइरा खानने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली आहे. सुरुवातीला त्यांनी नोंदणीविवाह केला. त्यानंतर त्यांनी उदयपूरमध्ये शाही विवाह केला.

आता 13 जानेवारीला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एक भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, रेखा, सायरा बानू, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, जुही चावला यांच्यासह अनेक नामवंत स्टार्स सहभागी झाले होते. संपूर्ण खान कुटुंबाचा स्टेजवर एकत्र फॅमिली फोटो क्लिक केला होता, मात्र या फोटोमध्ये आमिरची पत्नी किरण राव दिसत नव्हती.

किरणने आत्तापर्यंत सर्व फंक्शन्सला हजेरी लावली होती. ती रिसेप्शनमध्ये न दिसल्याने सर्वांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आइरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत आमिर खानची माजी पत्नी रीना दत्ता, मुले जुनैद आणि आझाद, पुतण्या इम्रान खान, भाऊ फैसल खान यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते, परंतु किरण राव गायब होती. आमिर खानने सांगितले की, तिला व्हायरल फिव्हर आहे. तो म्हणाला, 'किरणची तब्येत खराब असल्याने ती कार्यक्रमाला हजर राहू शकली नाही.'

या कार्यक्रमात शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचला. सलमान खान, रेखा, हेमा मालिनी, सायरा बानू, शर्मन जोशी, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, सचिन तेंडुलकर, आदिती राव हैदरी, सिद्धार्थ, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, जया बच्चन, श्वेता बच्चन, सोनाली बेंद्रे, सनी ली, सिद्धांत चतुर्वेदी, तापसी पन्नू, एआर रहमान, श्रिया सरन, रोनित रॉय, राजपाल यादव, अमीषा पटेल, कार्तिक आर्यन, साक्षी तन्वर, कमल हसनच्या मुली श्रुती आणि अक्षरा, धर्मेंद्र, कपिल शर्मा, सुष्मिता सेन, रणदीप हुडा, अर्चना पूरन सिंग असे अनेकजण हजर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Curchorem: ...तर पालिकेसमोरच मासळी विक्री करू! कुडचडेतील पारंपरिक विक्रेत्‍यांचा इशारा; बेकायदेशीर विक्रीमुळे असंतोष

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा धमाका! 'किंग कोहली'ला टाकले मागे; नावावर केला मोठा विक्रम

Bhandari Samaj: भंडारी समाजाच्या नेत्‍यांकडून मोर्चेबांधणी सुरू! एकसंघ करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू; लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

Morjim: ...तोपर्यंत ‘त्‍या’ स्मशानभूमीचा वापर नको! न्यायालयाचे निर्देश; मोरजी पंचायतीला धक्का

SCROLL FOR NEXT