Goa: म्हाडेश्वरांना दुबईत नाट्य दिग्दर्शनासाठी आमंत्रण

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

गोव्यातील म्हाडेश्वरांना दुबईत नाट्य दिग्दर्शनासाठी आमंत्रण

दुबई येथील एज्युस्कॅन संस्था विशेष मुलांकरीता काम करीत असून या मुलांसाठी 'एक फैसला ऐसा भी' या नाटकाची (Drama) निर्मिती केली जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

नाट्य शिक्षक आणि नामवंत नाट्य दिग्दर्शक प्रमोद म्हाडेश्वर यांना दूबई (Dubai) येथे नाट्य दिग्दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. दुबई येथील एज्युस्कॅन संस्था विशेष मुलांकरीता काम करीत असून या मुलांसाठी 'एक फैसला ऐसा भी' या नाटकाची (Drama) निर्मिती केली जाणार आहे.

जया सरकार यांनी या नाटकाचे लेखन केले असून 9 आणि 15 जानेवारी दुबई आणि अबुधाबी याठिकाणी नाटकाचे सादरीकरण होणार आहे. काही दिवस गोव्यातून (Goa) ऑनलायन तालीम दिल्यानंतर प्रमोद म्हाडेश्वर 1 जानेवारीला दुबईत (Dubai) पोचणार असून नाटक बसवण्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करतील. दरम्यान आयोजित कार्यशाळेत नाट्य शिक्षणाचे धडेही ते मुलांना देतील.

मोर्ले -सत्तरी येथील प्रमोद म्हाडेश्वर कला अकादमीच्या स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी असून सध्या गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खात्यात नाट्य शिक्षक म्हणून काम करतात. सत्तरीतील पिसूर्ले, अडवई, सावर्डे, नगरगांव आणि वाळपई या माध्यमिक शाळांमध्ये ते नाट्य शिक्षण देण्याचे काम पाहत आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या असून अनेक नाटकांना दिग्दर्शनही केले आहे. कला अकादमी आणि गोव्यातील इतर संस्थानी आयोजित केलेल्या अनेक नाटकांत त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पुरस्कारही (Award) प्राप्त झाले आहेत. लोककला आणि नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या केरी-सत्तरी येथील विवेकानंद कला सादरीकरण मंचाचे ते संस्थापक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT