Puneet Superstar Dainik Gomantak
मनोरंजन

Puneet Superstar : बिग बॉस फेम पुनीत सुपरस्टारचं इन्स्टाग्राम अकाऊंट हटवलं... MC स्टॅन- पुनीतचे चाहते एकमेकांसोबत भिडले...

सोशल मिडीयावर सध्या एक राडा सुरुय, बिग बॉस फेम पुनीत सुपरस्टार आणि एमसी स्टॅनचे चाहत्यांमध्ये एक वाद सुरुय

Rahul sadolikar

सोशल मिडीयावर सध्या एक राडा सुरूय. बिग बॉस या शोशी संबंधित असलेल्या माजी कंटेस्टंटच्या फॅन्सनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. अलीकडेच Bigg Boss OTT 2 मधुन प्रसिद्धीझोतात आलेला पुनित सुपरस्टारची त्याच्या फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ आहे. पुनित सुपरस्टारचे व्हिडीओ, त्याची भाषा या गोष्टींची सोशल मिडीयावर प्रचंड चर्चा असते.

पण आता पुनीतसोबत त्याचे फॅन्सही चर्चेत आहेत. पुनीतच्या फॅन्सने आता सोशल मिडीयावर आता एकच गदारोळ केलाय. पुनीतच्या इंन्स्टाग्राम अकांऊंट Removed झालं असल्याची चर्चा सुरु झालीय. काय आहे प्रकरण सविस्तर जाणुन घेऊ..

पुनीत सुपरस्टार सोशल मिडीयावर प्रसिद्ध

पुनीत सुपरस्टार सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे जवळपास 3.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. पुनित त्याच्या विचित्र व्हिडिओंनी हसवतो, तर काही लोकांना त्याचे व्हिडिओ खूपच भयंकर वाटतात.

आता अलीकडे, पुनीत सुपरस्टारचे अकाऊंट इंस्टाग्रामवर दिसत नाही, ज्याचे अनेक स्क्रीनशॉट त्याच्या चाहत्यांनी ट्विटरवर देखील शेअर केले आहेत.पुनितचे अकाऊंट बंद झाल्याने त्याचे अनेक चाहते संतापले असून पुनीतचे अकाऊंट परत आणावं म्हणु मागणी करताना दिसत आहेत.

एमसी स्टॅनच्या चाहत्यांमध्ये राडा

सोशल मीडियावर पुनीतचे अनेक चाहते असेही म्हणतात की, पुनीतच्या खात्यावर रॅपर एमसी स्टेनच्या आर्मीच्या म्हणजेच फॅन्सनी रिपोर्ट करुन अनेक वेळा तक्रार केलीय. ज्यामुळे पुनितचे खाते इन्स्टाग्रामवरुन काढून टाकण्यात आले आहे.

पुनीत सुपरस्टारचे इन्स्टाग्राम अकाऊंट गायब झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना राग अनावर झालाय. अनेक फॅन्सनी इन्स्टाग्रामला दोष दिलाय. एका युजरने ट्विट केले की, "पुनीत सुपरस्टारच्या खात्याची mc stan's Army ने अनेक वेळा तक्रार केली आहे. त्यामुळे त्याचे खाते लॉक झाले आहे"

यूजर म्हणतो

दुसर्‍या युजर्सने लिहिले की, "इन्स्टाग्रामने पुनित सुपरस्टारचे अकाऊंट काढून टाकले आहे कारण एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी त्याची अनेकदा तक्रार केली आहे". एकुणच पुनित सुपरस्टारचं अकाऊंट Removed होण्यात MC Stan च्या फॅन्सचा मोठा वाटा आहे, अशी चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

Goa Live News Updates: चलो बुलावा आया है! काँग्रेस हायकमांडकडून गोव्यातील नेत्यांना दिल्लीत येण्याचे आदेश

Purple Fest: पर्पल फेस्टसाठी गोवा सज्ज! 15 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

SCROLL FOR NEXT