Cannes Film Festival movies
Cannes Film Festival movies Dainik Gomantak
मनोरंजन

Cannes Film Festival movies : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हे भारतीय चित्रपट दाखवले जाणार...

Rahul sadolikar

कान्स फिल्म फेस्टिवल जगभरातल्या चित्रपटांसाठी एक मानाचा फिल्म फेस्टिव्हल समजला जातो. यावर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचं बिगुल वाजलं असुन 16 ते 23 मे या दरम्यान हा फेस्टिव्हल पार पडणार आहे.

राहुल रॉय अभिनीत आग्रा, राहुल भट आणि सनी लिओनचा केनेडी आणि 1990 मधील मणिपूरी चित्रपट इशानौ हे या वर्षी कान्समध्ये निवडले गेलेले भारतीय चित्रपट आहेत. 2023 कान्स फिल्म फेस्टिव्हल अगदी जवळच येऊन ठेपला आहे आणि सध्या त्यात निवडलेल्या भारतीय सिनेमांची चर्चा होत आहे.

अनुराग कश्यपच्या 'केनेडी'ची निवड महोत्सवाच्या मिडनाईट स्क्रीनिंग विभागात करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये, कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या अधिकृत ट्विटर हँडलने महोत्सवाच्या मिडनाईट स्क्रीनिंग विभागात अनुराग कश्यपच्या केनेडीची निवड जाहीर केली.

झी स्टुडिओ आणि गुड बॅड फिल्म्सचा, केनेडी हा अनुराग कश्यपच्या चित्रपटाची कथा थोडी वेगळी आहे. हा चित्रपट एका निद्रानाश झालेल्या माजी पोलिसाभोवती फिरतो, जो मृत आहे असं समजलं जातं, परंतु तरीही भ्रष्ट व्यवस्थेसाठी काम करतोय, आणि मुक्ती शोधत आहे. या चित्रपटात राहुल भट आणि सनी लिओनी मुख्य भूमिकेत आहेत.

अनुराग कश्यप म्हणाला, "हा एक चित्रपट आणि शैली आहे ज्याचा मला नेहमीच शोध घ्यायचा होता. पॅट्रिक मॅनचेटच्या गुन्हेगारी लेखनातून आणि जॅक टार्डी यांच्या कॉमिक बुकच्या मदतीने आणि मेलव्हिलच्या सिनेमातून प्रेरित असलेला हा चित्रपट आणि शैली आहे.

हा पोलिस ड्रामा मी झी स्टुडिओज, शारिक आणि टीम, नीरज, भूमिका, माझे निर्माते रंजन, कबीर आणि कवन, माझी संपूर्ण टीम, गुन्ह्यातील माझे भागीदार सिल्व्हर, काझविन, प्रशांत यांचा खूप आभारी आहे ज्यांनी मला या चित्रपटासाठी मदत केली. आपल्या आयुष्यातील 8 महिने देणारा राहुल भट, ते आव्हान स्वीकारणारी सनी लिओनी, मोहित टाकळकर यांनी केलेल्या कामाबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे.."

आग्रा हा चित्रपटही कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या डायरेक्टर्स फोर्टनाइट विभागात वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. कनू बहल यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या हिंदी चित्रपटाची निर्मिती सारेगामा इंडिया लिमिटेड, यूएफओ प्रोडक्शन आणि ओ28 फिल्म्स यांनी केली आहे.

आग्रामध्ये आशिकी स्टार राहुल रॉय याने मुख्य भूमिका केली आहे, जो या चित्रपटाद्वारे पुनरागमन करतो. यात प्रियंका बोस, पदार्पण अभिनेता मोहित अग्रवाल, रुहानी शर्मा आणि ज्येष्ठ अभिनेत्री विभा चिब्बर, सोनल झा आणि आंचल गोस्वामी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

मणिपुरी चित्रपट निर्माते अरिबम श्याम शर्मा यांचा 1990 चा पुरस्कार विजेता चित्रपट इशानौ यावर्षी कान्समध्ये प्रदर्शित होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या प्रतिष्ठित कान्स क्लासिक विभागात 19 मे 2023 रोजी रेड-कार्पेट वर्ल्ड प्रीमियरसाठी अधिकृतपणे त्याची निवड करण्यात आली आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या क्लासिक विभागात विचारात घेतलेला हा पुनर्संचयित चित्रपट एकमेव भारतीय चित्रपट आहे. या वर्षीच्या क्लासिक विभागात निवडला गेलेला हा चित्रपट आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT